Ordnance Factory च्या अधिकाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून ISI च्या महिला अधिकाऱ्याने मिळवली संवेदनशील माहिती 

रविंद्र कुमारला आयएसआय ISI महिला एजंटने नेहा शर्मा नावाने बनावट अकाऊंट बनवून जाळ्यात ओढले.

45

उत्तर प्रदेशातील दहशतवाद विरोधी पथकाने आग्रा येथील ऑर्डिनेंस फॅक्टरीतून (Ordnance Factory) फिरोजाबादच्या रविंद्र कुमार आणि त्यांच्या एका सहकाऱ्याला अटक केली आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI च्या महिला एजंटने सोशल मीडियावर रविंद्रसोबत मैत्री केली, त्यानंतर त्याच्याकडून संवेदनशील माहिती जमा करू लागली. या जाळ्यात रविंद्र कुमार अडकत गेला.

(हेही वाचा भारताने Pakistan ला खडसावले; म्हणाले, दहशतवादाचा खरा केंद्रबिंदू कुठे आहे, हे जगाला ठाऊक…)

रविंद्र कुमारला आयएसआय  ISI महिला एजंटने नेहा शर्मा नावाने बनावट अकाऊंट बनवून जाळ्यात ओढले. तपासात महिलेने स्वत:ला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेची एजंट असल्याचे सांगितले. त्यानंतर पैशाचे आमिष दाखवून रविंद्रकडून संवेदनशील माहिती काढून घेतली. रविंद्रनेही आयएसआयला  ISI एजंटला ऑर्डिनेंस फॅक्टरीतील निगडित अनेक गोपनीय कागदपत्रे पाकिस्तानला पाठवली. त्यात ऑर्डिनेंस फॅक्टरीचा  (Ordnance Factory) डेली प्रोडक्शन रिपोर्ट समावेश आहे. यात ड्रोन, गगनयान प्रोजेक्टबाबतही काही महत्त्वाची माहिती लीक करण्यात आली आहे. तसेच सैन्य आणि ऑर्डिनेंस फॅक्टरीतील (Ordnance Factory) काही गोपनीय कागदपत्रेही सापडली. त्यात ५१ गुरखा रायफल्सच्या अधिकाऱ्यांचे आणि लॉजिस्टीक ड्रोनच्या चाचणीची काही माहिती आहे. पाकिस्तानी महिला एजंटने  ISI रविंद्रशी फेसबुकवर मैत्री वाढवली. त्यानंतर व्हॉट्सअपवर चॅट, ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलही झाले. हळूहळू महिला एजंटने रविंद्र कुमारला प्रेमात अडकवले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.