भारतविरोधी दहशतवादी संघटनांचे विध्वंसक ‘कारनामे’!

भारताच्या विरोधात अनेक वर्षांपासून दहशतवादी कारवाया होत आल्या आहेत. आता हा दहशतवाद पसरवणाऱ्या संघटना नव्या नावाने पुन्हा अस्तित्वात आल्या आहेत.

पाकिस्तानात ३ प्रकारच्या दहशतवादी संघटना कार्यरत आहेत. त्यातील एक जागातिक पातळीवरील, दुसरे पाकपुरस्कृत आणि तिसरे पाकिस्तानातील अंतर्गत दहशवादी कारवाया करणाऱ्या संघटना! भारतातील कार्यरत दहशतवादी संघटनांना पाकिस्तान साहाय्य करते, त्यामध्ये पाकच्या आयएसआयची विशेष भूमिका असते. अशा प्रकारे एकीकडे पाकच्या मदतीने काश्मिरात ‘द  रेजिस्टेंस फ्रंट’ पोलिसांची हत्या करत आहे. दुसरीकडे आईएसआईएसचे ‘डिजिटल मॅगजीन’ भारतातील मुसलमानांना सरकारी यंत्रणेच्या विरोधात विद्रोह करण्यास प्रोत्साहित करत आहे. हे कमी होते म्हणून खालिस्तान्यांचे म्होरके विदेशात बसून किसान युनियनच्या आंदोलनात खलिस्तानी झेंडा फडकावण्याचा मनसुबा ठेवून आहेत.

‘सिख फॉर जस्टीस’चा गुरपतवंत सिंह पन्नू हा रेफ्रेन्डम २०२० (जनमत संग्रह २०२०) प्रकरणी तोंडावर पडल्यानंतर तो आता आणखी एक मोठे षडयंत्र रचण्याच्या तयारीत आहे. त्याने आता ‘खंडा या तिरंगा’ या नावाने भारतविरोधी मोहीम चालवली आहे. ज्यामध्ये धर्माच्या आडून राष्ट्रप्रेमी शिखांना जाळ्यात ओढण्याचा त्याचा प्रयत्न आहे. यामागे पाकचा हात आहे. दुसरीकडे लष्कर-ए तोयबाचा भाग असलेला  ‘द रेजिस्टेन्स फ्रंट’काश्मीरमध्ये हत्याकांड घडवत आहे. याला आयएसआयएसच्या ऑनलाईन मॅगझीन ‘द वॉइस ऑफ हिंद’ चे समर्थन आहे. यात भारताला काफिरांचा देश असल्याचे संबोधित करून स्थानिकांमध्ये भारतद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

(हेही वाचा : खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नूः पाकिस्तानने पढवलेला ‘पोपट’)

दहशतवादी संघटना अनेक लक्ष्य मात्र एक!

द वॉईस ऑफ हिंद – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना  आयएसआयएसच्या ‘डिजिटल मॅगझीन’ मध्ये भारताच्या अंतर्गत कारवायांची उदाहरणे देत मुसलमानांना सरकारच्या विरोधात षडयंत्र आखण्यासाठी प्रेरित केले. यात भारताला ‘दक्षिण आशियातील इस्राईल’ म्ह्णून संबोधित करण्यात आले आहे. त्यामध्ये मुसलमानांना दहशतवादी कारवायांसाठी उचकवण्याचा प्रयत्न केला आहे. बाबरी मशिदीचा विध्वंस, गुजरात दंगल आणि त्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांची भूमिका, काश्मीरमधून ३७० हटवणे आणि लक्षद्वीपमध्ये सध्या प्रशासकांच्या सुधारणा कार्यक्रमाला मुसलमान विरोधी दर्शविण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला आहे.मालदीवसोबत भारताचे वाढते संबंध यावरही दहशतवादी संघटनांना अडचण होऊ लागली आहे. मॅगझिनमध्ये सुचवण्यात आलेले तर्क पाकिस्तान आणि चीन यांच्या अजेंड्याप्रमाणेच आहेत. आयएसआयएस ते अंमलात आणण्यासाठी मुसलमानांचा वापर करत आहे.

द रेजिस्टेन्स फ्रंट – लष्कर-ए-तोयबाचा ‘द रेजिस्टेन्स फ्रंट’  हा भाग आहे. ही संघटना काश्मिरात दहशतवादी कारवाया घडवून आणत आहे. २२ जून २०२१ रोजी संघटनेने जम्मू-काश्मीर पोलिस निरीक्षक परवेझ अहमद डार यांची गोळी मारून हत्या केली. पत्राच्या माध्यमातून या संघटनेने या हत्येची जबाबदारी स्वीकारली. अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर याची स्थापना झाली. ही लष्कर-ए तोयबाची सावली आहे. ज्यामाध्यमातून काश्मिरात लष्करच्या दहशतवाद्यांना सक्रिय करण्यात आले आहे. या नव्या नावाच्या संघटनेच्या माध्यामातून पाक आता फाइनेन्शियल एक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) च्या ग्रे सूचीतून स्वतःची सुटका करू पाहत आहे. संघटना तीच लष्कर-ए तोयबा पण नाव नवीन द रेजिस्टेन्स फ्रंट. याआधी ९०च्या दशकात धर्मनिरपेक्ष वाटावे अशा नावाने अर्थात जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंट ही दहशतवादी संघटना सक्रिय होती.

(हेही वाचा : किसान युनियन आंदोलन बनले गुन्हेगारांचा अड्डा!)

पन्नूचे षडयंत्र  – अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया येथील खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू हा खंडा साहेब यांचाही अपमान करत आहे. शिखांसाठी पवित्र प्रतिकाचा उपयोग लोकांना एकत्र करून दहशतवादी बनवण्यासाठी करत आहे. यामागेही भारताचा शत्रू पाकिस्तान आहे. ज्या दहा जणांना सुरक्षा एजन्सीने खलिस्तानी कारवाया करणारे दहशतवादी म्ह्णून संबोधित केले आहे. त्यामध्ये अनेक जण पाकमध्ये बसून भारतविरोधी कारवाया करत आहेत.

परमजीत सिंह पंजवार – हा लाहोर येथून खलिस्तान कमांडो फोर्सचे संचालन करत आहे. वाधवा सिंह बब्बर – हा ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’चा प्रमुख वाधवा सिंह बब्बर भारतात खलिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. याशिवाय तो लाहोर येथून येणाऱ्या बनावट भारतीय नोटा तस्करीच्या माध्यमातून भारतात पाठवायचा.

गजिंदर सिंह हायजॅकर – लाहोर येथील दल खालसा (इंटरनॅशनल) च्या माध्यमातून शिख धर्माचा वापर करून शिखांना खलिस्तानचे समर्थक बनवण्याचे षडयंत्र रचतो.

रणजीत सिंह नीता – हादेखील लाहोर येथे बसून खलिस्तानी जिंदाबाद फोर्स चालवतो. याच्या संघटनेला हिजबुल मुजाहिद्दीनचा पाठिंबा असल्याचा समजते. ड्रोनच्या माध्यमातून यांची संघटना पंजाबमध्ये शस्त्र पाठवते, असा आरोप आहे.

(हेही वाचा : आता पीएफआयचा देशविघातक चेहरा होतोय उघड!)

लखबीर सिंह रोडे – हा खलिस्तानी दहशतवादी जनरल सिंह बिंद्रा वाले यांचा भाचा आहे. याच्या संघटनेचे नाव इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशन असे आहे. तो ननकाना साहिबमध्ये राहत होता आणि तिथेच तो युरोपमध्ये खलिस्तानसाठी समर्थन मिळवत आहे.

गुरपतवंत सिंह पन्नू – हा अमेरिकामध्ये टॅक्सी चालवायचा. परंतु काही दिवसांत त्याच्याकडे प्रचंड संपत्ती आली. आत तो ‘सिख फॉर जस्टीस’ च्या नावानी संस्था चालवत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार त्याचे न्यूयॉर्कमध्ये कार्यालय आहे. जेथे पन्नू हा एसएफजेचा कायदेशीर सल्लागार म्हणून काम  सांभाळत आहे. सध्या तो ‘खंडा या तिरंगा’ या भारत विरोधी दहशतवादी षडयंत्र चालवत आहे. याआधी तो ‘रेफरेंडम 2020’  नावाने पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान निर्माण करण्यासाठी शिखांचे जनमत उभे करत होता, मात्र त्यात तो असफल ठरला. त्याचा थेट संबंध हा पाकिस्तानात बसलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांशी होता, तसेच पाकिस्तानी दूतावासामधून याला पैसे मिळायचे अशी माहिती आहे. पन्नू, कॅनडाचा गुरमीत सिंह, मनमंदर मो धालीवाल या सर्वांचा संबंध भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाशी जोडला जात आहे. हे सर्वजण टूलकिट बनवणे, ते व्हायरल करणे, भारतीय दूतावासाच्या बाहेर आंदोलन करणे या सर्वांमागील सूत्रधार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here