बांगलादेशमध्ये (Bangladesh iskcon temple) जातीय तणाव वाढत आहे. चटगावस्थित इस्लामिक संघटनेने (Islamic organization) बांगदेशातील इस्कॉन मंदिरावार वर बंदी घालण्याची मागणी केली आहे. याबाबत भारतात निर्वासित राहणाऱ्या बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन (Taslima Nasreen) यांनी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केली आहे. या व्हिडिओमध्ये हिफाजत-ए-इस्लाम नावाची इस्लामिक संघटना इस्कॉनवर हल्ला करण्याबाबत बोलताना दिसून येत आहे. (Taslima Nasreen)
इस्कॉनच्या सदस्यांना भेडसावणाऱ्या धोक्यांचे वर्णन करताना तस्लिमा नसरीन म्हणाल्या की, “हेफाजत-ए-इस्लामने या संघटनेने पुन्हा दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना इस्कॉनच्या सदस्यांना मारायचे आहे. इस्कॉन ही दहशतवादी संघटना आहे का ? तिच्यावर बंदी घातली पाहिजे का? असा सवाल देखील उपस्थित केला आहे. इस्कॉन मंदिराने कधीही हिंसेला प्रोत्साहन दिलेले नाही. “इस्कॉन जगभरातील अनेक देशांमध्ये अस्तित्वात आहे आणि कुठेही अशा समस्यांना तोंड देत नाही, परंतु बांगलादेशात या समस्या आहेत.
The Chittagong-based group Hefazat-e-Islam has called for a ban on ISKCON. Today, their slogan was: “Catch one ISKCON, then slaughter.” Hefazat-e-Islam has called for terrorism. They want to kill ISKCON members. Is ISKCON a terrorist organization that it should be banned? Have… pic.twitter.com/tDNoLczzzE
— taslima nasreen (@taslimanasreen) November 8, 2024
बांगलादेशातील ही सर्व परिस्थिती केवळ इस्लामिक कट्टरवाद्यांमुळेच निर्माण झाली आहे, असे तस्लिमा नसरीन यांनी म्हटले आहे. तर इस्लामी आणि जिहादी लोक इतर लोकांना सहन करू शकत नाहीत. याबबात भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालचे भारतीय जनता पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी चिंता व्यक्त केली आणि हा इस्कॉनवरचा “नियोजित हल्ला” असल्याचे म्हटले आहे. चटगावमधील मिरवणुकीचा व्हिडिओ शेअर करताना अधिकाऱ्याने असा दावा केला की कट्टरपंथी “या बांगलामध्ये इस्कॉनसाठी जागा नाही” अशा घोषणा देत आहेत. ते म्हणाले, “जर कट्टरपंथी इस्कॉनवर हल्ला करण्याचा विचार करत असतील तर ते त्याचे परिणाम सहन करू शकणार नाहीत.”
(हेही वाचा – Respiratory Disorders : २०१९ ते २०२२ मध्ये श्वसनविकारांमुळे मुंबईत ३३,७११ जणांचा मृत्यू)
हिंसा कधी सुरू झाली
नोव्हेंबर 5 रोजी उस्मान अली या स्थानिक व्यावसायिकाने फेसबुकवर इस्कॉनचे वर्णन “दहशतवादी गट” (terrorist group) म्हणून पोस्ट केल्यावर, चितगावच्या हजारी गली भागात हिंदू समुदायामध्ये संतापाची लाट उसळली तेव्हा जातीय संघर्ष सुरू झाला. प्रत्युत्तर म्हणून, संयुक्त पोलीस आणि लष्करी दलांनी एक कारवाई सुरू केली ज्यामध्ये सुमारे 100 संशयितांना अटक करण्यात आले आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community