Israel च्या निशाण्यावर आता ‘हा’ मुस्लिम देश; हल्ल्यात १५ लोकांचा मृत्यू

63
Israel च्या निशाण्यावर आता 'हा' मुस्लिम देश; हल्ल्यात १५ लोकांचा मृत्यू
Israel च्या निशाण्यावर आता 'हा' मुस्लिम देश; हल्ल्यात १५ लोकांचा मृत्यू

हमास, हिजबुल्लाहनंतर आता इस्त्रायलने (Israel) सीरियावर (syria) भीषण हल्ले सुरु केले आहेत. इस्त्रायलच्या हवाई दलाने ईराण आणि त्याच्या प्रॉक्सी संघटनांचा गड बनलेल्या सीरियावर हल्ला केला आहे. इस्त्रायल (Israel) त्याला ईराणी ऑक्टोपस म्हणतो. इस्त्रायलने सीरियावरील हल्ले वाढवले आहे. सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सीरियाची राजधानी दमिश्कवर हल्ला करण्यात आला होता.

(हेही वाचा-Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक ट्विट; नव्या राजकीय वादळाचे संकेत?)

गुरुवारी इस्त्रायल (Israel) लष्कराने मेजह आणि कादिसियाहवर हल्ले केले होते. सीरियाचे लष्कर आणि इस्लामिक जिहादच्या मुख्यालयाला लक्ष्य केले होते.नत्यात 15 लोकांचा मृत्यू झाला होता. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, दमास्कसच्या (Damascus) या भागात पूर्वी हमास आणि इस्लामिक जिहादच्या दहशतवाद्यांची वस्ती होती. आता ते इराणी रिव्होल्युशनरी गार्ड आणि हिजबुल्लाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यानंतर इस्त्रायलने शुक्रवारी हल्ले केले.

(हेही वाचा-Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना दिलासा!)

शुक्रवारी झालेल्या हल्ल्याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया सीरियाने दिलेली नाही. या हल्ल्यांमध्ये इस्रायलने (Israel) इराणी रिव्होल्युशनरी गार्ड आणि तेहरानच्या प्रॉक्सी अतिरेकी गटांच्या नेत्यांना लक्ष्य केले आहे. इस्त्रायलच्या आयडीएफने एक दिवस आधी सीरिया-लेबनॉन (Syria-Lebanon) सीमेवर सीरियन क्रॉसिंगवर हल्ला केल्याचे म्हटले होते. हिजबुल्लाला शस्त्रे पाठवण्यासाठी या क्रॉसिंगचा वापर करण्यात येतो. क्रॉसिंगवरील हल्ल्यामुळे हिजबुल्लाहच्या युनिट 4400 चे मोठे नुकसान झाले आहे, असे इस्त्रायलने म्हटले आहे. इस्रायलने (Israel) लेबनॉनमधील हवेतून 300 हून अधिक लक्ष्यांवर हल्ले केले, ज्यात बेरूतमधील दहियाहच्या मध्यभागी सुमारे 40 लक्ष्यांचा समावेश आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.