इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध (Israel-Palestine Conflict) आता ४ दिवसांसाठी थांबले आहे. मात्र त्याआधी इस्रायल लष्कराने जेव्हा येथील रुग्णालयावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यावर जोरदार टीका होत होती, मात्र इस्त्रायल लष्कराचा त्या रुग्णालयाच्या तळाशी हमासच्या अतिरेक्यांनी भुयार बांधले असल्याचा दावा केला होता. त्यामुळे त्यानुसार लष्कराने हल्ला करून त्याखाली भुयाराचा शोध घेतला. त्या भुयाराचा व्हिडिओच जारी केला. या भुयारात हमासच्या अतिरेक्यांनी आलिशान निवासी व्यवस्था बांधली असल्याचे त्या व्हिडिओतून दिसत आहे.ज्याला हमासने कमांड सेंटर म्हटले आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
- इस्रायल लष्कराने हा व्हिडीओ एक्स (ट्विटर) हँडलवर शेअर केला आहे. यामध्ये इस्रायलचे लष्करी अधिकारी या भुयारांची माहिती देत आहेत. या भुयारांमध्ये सुसज्ज यंत्रणा, वीजपुरवठा, वातानुकूलित यंत्रणा, झोपण्याच्या खोल्या, बैठकीची खोली, शौचालये अशी सर्व व्यवस्था असल्याचे दिसत आहे.
Dear world, is this enough proof for you? pic.twitter.com/Z3HNDPNV3O
— Israel Defense Forces (@IDF) November 22, 2023
- विशेष म्हणजे इस्रायलने हल्ला केलेल्या अल शिफा रुग्णालयाच्या खाली असणाऱ्या या भुयारांच्या जाळ्याचे एक टोक रुग्णालयाच्या नजीक असणाऱ्या एका निवासी घरात निघत असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे. ‘एवढा पुरावा तुमच्यासाठी पुरेसा आहे का?’ अशी ओळ या पोस्टमध्ये लिहिली आहे.
- या भुयाराची साधारण उंची ६ ते साडेसहा फूट असून रुंदी तीन फूट आहे. हमासचे दहशतवादी या भुयाराचा वापर करूनच हल्ल्यापासून स्वत:चा बचाव करत आहेत. त्यांनी या रुग्णालयाचा वापर मानवी कवच म्हणून केला.
(हेही वाचा Israel Hamas War : 10 नवीन ओलिसांना सोडल्यास एक दिवसाचा युद्धविराम)
Join Our WhatsApp Community