इस्रायली हवाई हल्ल्यात (Israel Attack) हमासचा सर्वोच्च राजकीय नेता सलाह अल-बर्दावील आणि त्यांची पत्नी ठार झाले आहेत. रविवारी सकाळी हमासने याची पुष्टी केली. दक्षिण गाझामधील खान युनिस शहरात हा हल्ला झाला. गेल्या आठवड्यात मंगळवारी इस्रायलने युद्धबंदीचा भंग केला आणि गाझामध्ये पुन्हा हल्ले सुरू केले. या हल्ल्यांमध्ये सुमारे ६०० पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाला आहे. (Israel Attack)
हेही वाचा-Judge Yashwant Varma यांच्या घरात अर्धवट जळालेल्या नोटांचा सर्वोच्च न्यायालयाने Video केला जारी
इस्रायली लष्कराने सांगितले की ते गाझा शहरातील तीन भागांवर नवीन हल्ल्यांची योजना आखत आहेत आणि पॅलेस्टिनींना तेथून निघून जाण्याचा इशारा दिला. हमासने ताब्यात घेतलेल्या ५९ ओलिसांची सुटका होईपर्यंत इस्रायलने गाझामध्ये हल्ले तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत. या ओलिसांपैकी २४ जण जिवंत आहेत.(Israel Attack)
हेही वाचा- सुनीता विल्यम्स यांना Donald Trump ओव्हरटाइम पगार देणार !
शनिवारी रात्री इस्रायलने लेबनॉनमध्ये अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला आहे. लेबनॉनमधून डागण्यात आलेल्या रॉकेटच्या प्रत्युत्तरात इस्रायलने हा हल्ला केला. गेल्या ४ महिन्यांपासून सुरू असलेल्या हिजबुल्लाहसोबतच्या युद्धविरामानंतर इस्रायलचा हा पहिलाच मोठा हल्ला होता.(Israel Attack)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community