इस्त्रायल (Israel) ने मंगळवारी गाझामध्ये केलेल्या हवाई हल्यात हमास सरकारचे प्रमुख इस्साम अल-दालिस यांच्यासह अनेक उच्च अधिकारी ठार झाल्याचा दावा पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने केले आहेत. ओलिसांना सोडण्यास हमासचा वारंवार नकार दिल्यानंतर दोन महिन्यांच्या युद्धबंदीनंतर पुन्हा एकदा हल्ला केल्याचे इस्रायलने स्पष्ट केले आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने म्हटले आहे की, इस्रायली सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात मारल्या गेलेल्या अधिकाऱ्यांच्या यादीत एसाम अल-दलिस यांचा समावेश आहे. तसेच या हल्ल्यांमध्ये गृह मंत्रालयाचे प्रमुख महमूद अबू वत्फा आणि अंतर्गत सुरक्षा सेवेचे महासंचालक बहजत अबू सुलतान यांचाही मृत्यू झाला आहे.
(हेही वाचा Nagpur violence : पोलिसांवरील हल्ला कदापि सहन करणार नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा)
युद्धबंदी वाटाघाटी फिस्कटल्यानंतर इस्रायलने (Israel) मध्य गाझामध्ये पुन्हा एकदा हवाई हल्ला केला. यामध्ये 300 हून अधिक लोक मारले गेले आहेत. इस्रायली सैन्याने टेलिग्रामवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ते सध्या गाझा पट्टीतील हमास दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी ठिकाणांवर व्यापक हल्ले करत आहेत. अलीकडील हल्ल्यांपूर्वी, इस्रायलने गेल्या दोन आठवड्यांपासून सर्व अन्न, औषध, इंधन आणि इतर पुरवठा रोखला होता, हमासने त्यांच्या युद्धबंदी करारात बदल स्वीकारण्याची मागणी केली होती. अलीकडील इस्रायल-हमास शांतता चर्चा अनेक कारणांमुळे अयशस्वी झाली, ज्यामध्ये हमासने अतिरिक्त ओलिसांना सोडण्यास नकार दिला. यानंतर युद्धबंदी मोडली गेली. गाझामध्ये इस्रायली (Israel) हवाई हल्ले पुन्हा सुरू केले आहेत. इस्रायलने व्यापक बॉम्बस्फोट केले आणि हमासने सतत हल्ले सुरू ठेवले, यामुळे वाटाघाटीच्या शक्यता आणखी कमी झाल्या आहेत.
Join Our WhatsApp Community