Israel Hamas conflict: अनेक महिने युद्ध सुरू राहण्याची इस्रायलने व्यक्त केली शक्यता

209
Israel Hamas conflict: अनेक महिने युद्ध सुरू राहण्याची इस्रायलने व्यक्त केली शक्यता
Israel Hamas conflict: अनेक महिने युद्ध सुरू राहण्याची इस्रायलने व्यक्त केली शक्यता

हमासने इस्रायलवर ७ ऑक्टोबरला सुरू केलेल्या हल्ल्यामुळे सुरू झालेल्या युद्धामुळे विध्वंस घडवून आणला. या युद्धात १८,०००हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले. यामुळे महिला आणि अल्पवयीन मुलांचा समावेश जास्त आहे. उत्तर गाझाचा बराचसा भाग नष्ट झाला असून येथील ८० टक्के लोकसंख्या कमी झाली आहे. शेकडो नागरिक त्यांची घरे सोडून सुरक्षित स्थानी पळून गेले आहेत. यादरम्यान हे युद्ध अजून काही आठवडे किंवा महिने सुरूच राहू शकते, अशी माहिती मंगळवारी इस्रालयने दिली आहे.

संयुक्त राष्ट्रांमध्ये बंधनकारक नसलेल्या मतदानाच्या आधी इस्रायल आणि अमेरिकेला युद्धबंदीच्या जागतिक आव्हानांचा सामना करावा लागाला. गाझामध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा प्रणाली आणि मानवतावादी मदतकार्ये सुरू आहेत. मदत कर्मचाऱ्यांनी आश्रयस्थानांमध्ये आणि तंबूंमध्ये आश्रय घेतला आहे. विस्थापित लोकांमध्ये उपासमार आणि रोगाचा प्रसार होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

(हेही वाचा – Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षक संघटना बेमुदत संपावर)

दक्षिण गाझामध्ये नागरिकांना आश्रय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येथील काही भागात मंगळवारी रात्रभर झालेल्या हल्ल्यामध्ये किमान २३ लोक ठार झाले. मध्य गाझामध्ये, देइर अल-बलाह येथील अल-अक्सा शहीद रुग्णालयात, रुग्णालयाच्या नोंदींनुसार, रात्रभर हल्ल्यात ठार झालेल्या ३३ लोकांचे मृतदेहांची नोंद झाली. यामध्ये १६ महिला आणि ४ लहान मुलांचा समावेश आहे.

नॉर्वेच्या जहाजावर क्षेपणास्त्राचा हल्ला
येमेनच्या हौथी बंडखोरांनी लाल समुद्रात येमेनच्या किनाऱ्याजवळील एका महत्त्वाच्या सागरी चोकपॉईंटजवळ नॉर्वेच्या ध्वजाच्या टँकरवर क्षेपणास्त्र सोडले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. तेल आणि रासायनिक टँकर स्ट्रिंडावरील हल्ल्यामुळे इराणचे समर्थन करणाऱ्या बंडखोरांनी बाब अल-मंडेब सामुद्रधुनीजवळच्या जहाजांना लक्ष्य करण्याची मोहिम हाती घेतली होती. या मोहिमेला त्याने व्यापक स्वरूप दिले. यामुळे सुएझ कालव्यातून येणाऱ्या मालवाहतुकीला संभाव्य धोका निर्माण झाला आहे. हौथी सैन्याचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल याह्या सारी यांनी एका व्हिडिओद्वारे आपले निवेदन सोशल मिडियाद्वारे शेअर केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.