इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविराम!

हे युद्ध थांबवण्यात यावे यासाठी अमेरिकेकडून इस्राईलवर दबाव टाकण्यात आला होता. त्यामुळे इस्राईलने हा निर्णय घेतला आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये सुरु असलेले युद्ध अखेर इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली. त्यामुळे आता हे युद्ध थांबले आहे. हे युद्ध थांबवण्यात यावे यासाठी अमेरिकेकडून इस्राईलवर दबाव टाकण्यात आला होता. त्यामुळे इस्राईलने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर तब्बल ११ दिवसांनी गाझा पट्टीत लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

११ दिवस सुरु होते युद्ध! 

हमासने सर्वात आधी इस्राईलवर रॉकेट हल्ले केल्यानंतर इस्राईलने थेट युद्ध सुरु केले. तब्बल ११ दिवस हे युद्ध सुरु होते. यात सर्वाधिक नुकसान हमासचे झाले. या युद्धामुळे गाझा शहराचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर इस्रायलच्या अनेक भागातील रोजचे व्यवहार ठप्प झाले होते. या युद्धात ३००हून अधिक जण मारले गेले आहेत. नेतन्याहू यांच्या सुरक्षा मंत्रिमंडळाने इस्रायलचे सैन्य प्रमुख आणि प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांच्या शिफारशीनंतर युद्धविराम करण्याची घोषणा केली. या ऑपरेशनमध्ये मिळालेले यश अभुतपूर्व आहे. प्रत्यक्ष परिस्थितीचे आकलन केल्यानंतर भविष्यातील कारवाईची दिशा निश्चित केली जाईल, असे इस्राईल पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे. हे वक्तव्य म्हणजे हमास या दहशतवादी संघटनेला इशारा असल्याचे मानले जात आहे.

(हेही वाचा : इस्राईलकडून हमासच्या ४० ठिकाणी बॉम्बहल्ला!)

अमेरिकेने केले स्वागत

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी देखील इस्रायल-हमास यांच्यातील युद्धविरामाला दुजोरा दिला आहे. बायडेन यांनी या निर्णयाबद्दल इस्रायलची प्रशंसा केली आहे. त्यांनी यापूर्वी दहशतवादी हल्ल्यांपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी इस्रायलच्या कारवाईला पाठिंबा दिला होता. माझ्या मते आपल्याला पुढे जाण्याची ही चांगली संधी आहे. मी या विषयावर काम करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे बायडेन यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here