Israel-Hamas Conflict: ‘इस्रायलवर हल्ला केलात तर…’; बेंजामिन नेत्यानाहू यांनी दिली हिज्बुलाहला धमकी

इस्रायल लष्कर उत्तम कामगिरी करत असल्यामुळे पंतप्रधान नेत्यनाहू यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. 

242
Israel-Hamas Conflict: 'इस्रायलवर हल्ला केलात तर...'; बेंजामिन नेत्यानाहू यांनी दिली हिज्बुलाहला धमकी
Israel-Hamas Conflict: 'इस्रायलवर हल्ला केलात तर...'; बेंजामिन नेत्यानाहू यांनी दिली हिज्बुलाहला धमकी

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध (Israel-Hamas Conflict) ७ ऑक्टोबरपासून सुरू झाले. आजतागायत हा संघर्ष थांबलेला नाही. हे घनघोर युद्ध सुरू असतानाच बेंजामिन नेत्यनाहू यांनी लेबनॉनचे इराण समर्थक हिज्बुल्लाह गटाला धमकी दिली आहे.

नेत्यनाहू म्हणाले की, हिज्बुल्लाहने इस्रायलसह तिसऱ्या लेबनॉन युद्धाची सुरुवात करू नये नाहीतर आम्ही लेबनॉनची राजधानी बेरुतची अवस्था गाझासराखी करू. नेत्यनाहू यांनी ही खुली धमकी दिली आहे. त्यांचं हे वक्तव्य अशा वेळी समोर आलं आहे. ज्यावेळी हिज्बुल्लाहने एक गाईडेट मिसाईल हल्ला केला होता. या हल्ल्यात ६० वर्षांच्या इस्रायली नागरिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर हिज्बुल्लाहचे समर्थक हमासला पाठिंबा देत हल्ले करत आहेत. यावेळी त्यांना नेत्यनाहू यांनी धमकी दिली. पंतप्रधान नेत्यनाहू, संरक्षण मंत्री गॅलंट आणि IDF चीफ-ऑफ-स्टाफ लेफ्टनंट-Gen. हलेवी यांनी IDF नॉर्दर्न कमांड मुख्यालयात मूल्यांकन केले आणि नंतर अप्पर गॅलिलीमधील तोफखाना बॅटरीला भेट दिली. जिथे त्यांनी राखीव पायदळ आणि तोफखाना सैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘X’ द्वारे ही माहिती दिली आहे.

(हेही वाचा – Khichdi Scam : सह्याद्री रिफ्रेशमेंटच्या खात्यातून ८ लाख भाडे आल्याचा संदीप राऊतांचा दावा)

केरेम शालोम सीमा भाग खुला करण्यास संमती…
हमासने हल्ला केल्यानंतर इस्रायलने त्यांचा उत्तरेकडील सीमाभाग रिकामा केला. हिजबुल्लाहचे मनसुबे यशस्वी होऊ नयेत. म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं होतं. दुसरीकडे पॅलेस्टाईनच्या आरोग्य विभागाने रविवारी सांगितले की, इस्रायल आणि हमासच्या युद्धात गाझामध्ये आतापर्यंत १,८७३ मुलांचा मृत्यू झाला. ७ ऑक्टोबरला जे नागरिक मारले गेले त्यातल्या ७६९ मृतदेहांची ओळख पटली आहे. इस्रायल आणि हमास युद्ध चालू असताना आतापर्यंत गाझामध्ये २९ कर्मचारी मारले गेले आहेत. इस्रायल सरकारने नागरिकांच्या मदतीला वेग यावा यासाठी केरेम शालोम सीमा भाग खुला करण्यास संमती दिली आहे.

इस्त्रायल लष्कराचे पंतप्रधान नेत्यनाहूंकडून कौतुक
“जर हिज्बुलाहने युद्ध सुरू करण्याचा निर्णय घेतला असेल तर आम्हीही बेरुतची अवस्था गाझा आणि खान यूनिससारखी करू हे त्यांनी लक्षात ठेवावं तसंच हल्ले सुरूच ठेवले तर ती वेळ लवकरच येईल हे विसरू नका. आम्ही जिंकण्यासाठी कटिबद्ध आहोत. इस्रायली सैन्याच्या मदतीने आम्ही हे युद्ध जिंकू.”,अशी थेट धमकीच त्यांना पंतप्रधान नेत्यनाहू यांच्याकडून देण्यात आली आहे. यावेळी इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट आणि लष्करप्रमुखही होते. नेत्यनाहू यांनी लष्करी सैनिकांची भेट घेतली आणि त्यांचा उत्साह वाढवला. इस्रायल लष्कर उत्तम कामगिरी करत असल्यामुळे पंतप्रधान नेत्यनाहू यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.