गाझा शहरातील उत्तर भागात हमासचे प्राबल्य (israel hamas conflict) असलेल्या विभागावर कब्जा केल्याचा इस्त्रायलने दावा केला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना आम्ही तीन इस्रायली लष्करी वाहने आणि बुलडोझर (Bulldozer) नष्ट केला आहे. त्यामध्ये इस्त्रायलच्या दोन रणगाड्यांचा समावेश असल्याचा दावा हमासची लष्करी संघटना अल-कासमने केला आहे.
इस्त्रायलमधील ऐशादाद शहरावरही हमासने क्षेपणास्त्राचा मारा केला आहे. इस्रायलने हमासच्या ठिकाणांवर बॉम्ब हल्ले करणे सुरूच ठेवले आहे तसेच सिरीयाच्या पूर्व भागातील सीमेजवळ असलेल्या दहशतवाद्यांच्या तळावर अमेरिकेत्या लढाऊ विमानांनी नुकतेच जोरदार हल्ले केले. अमेरिकेच्या एफ-१५ लढाऊ विमानांनी दहशतवाद्यांच्या तळावर तसेच शस्त्रागारावर हल्ला चढवला. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले.
(हेही वाचा – Electricity Employees Diwali Bonus : वीज कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार खास; १८,५०० रुपयांचा बोनस जाहीर)
अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉइड ऑस्टिन यांच्या दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे लष्कर आणि नागरिकांच्या सुरक्षेला राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सरकारने नेहमीच प्राधान्य दिले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community