Israel-Hamas conflict: इस्रायल-हमास युद्ध ४ दिवसांसाठी थांबवले, ‘हा’ झाला करार

146
Israel-Hamas conflict: इस्रायल-हमास युद्ध ४ दिवसांसाठी थांबवले, 'हा' झाला करार
Israel-Hamas conflict: इस्रायल-हमास युद्ध ४ दिवसांसाठी थांबवले, 'हा' झाला करार

इस्त्रायल आणि हमास (Israel-Hamas conflict) यांच्यामध्ये गेल्या दीड महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. हमासने ओलीस ठेवलेल्या ५० महिला आणि मुलांच्या सुटकेच्या बदल्यात इस्रायल सरकारने १५० पॅलेस्टिनी कैद्यांची तुरुंगातून सुटका करण्यासोबत युद्धाला ४ दिवसांचा ब्रेक दिला आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांच्या कार्यालयाने सांगितले की, इस्रायल सरकारने गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या ५० महिला आणि मुलांची सुटका करण्यासाठी पॅलेस्टिनी हमास दहशतवाद्यांशी केलेल्या कराराला पाठिंबा दिला आहे.

ओलिसांना एकत्र सोडले जाणार नाही

इस्रायल सुरक्षेच्या गुन्ह्यांसाठी आपल्या तुरुंगात असलेल्या १५० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे, मात्र यामध्ये अशा लोकांची सुटका करण्यात येणार आहे, ज्यांच्यावर कोणत्याही प्राणघातक दहशतवादी हल्ल्यात दहशतवादी असल्याचा थेट आरोप नाही. या करारानुसार, ९६ तासांत युद्धविरामाच्या बदल्यात पहिल्या चार दिवसांत ५० ओलिसांची सुटका केली जाईल. एका दिवसांत ५० ओलिसांना एकत्र सोडले जाणार नाही, तर दोन किंवा तीन गट करून सोडले जाईल.

(हेही वाचा – Kartiki Ekadashi 2023 : ठरलं ! विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते)

गाझामध्ये ठेवलेल्या उर्वरित ओलिसांची सुटकेची शक्यता

पुढील चार दिवस युद्ध थांबवले, तर गाझामध्ये ठेवलेल्या उर्वरित ओलिसांची सुटका होण्याची शक्यता आहे. सुटकेसाठी नियोजित असलेले सर्व जण जिवंत आहेत आणि त्यांच्याकडे इस्रायली नागरिकत्व आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील करारामध्ये कतारचे अधिकारी मध्यस्थी करत आहेत. पंतप्रधान नेत्यनाहू म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी करारापर्यंत पोहोचण्यास मदत केली. यामध्ये ओलीस ठेवलेल्यांसाठी काही सवलतींचा समावेशही आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.