इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहेत. अल-शिफानंतर इस्त्रायलने उत्तर गाझामधील ‘इंडोनेशियन’ या रुग्णालयावर हल्ला केला आहे. (israel-hamas-conflict )
गाझामधील रुग्णालयांमध्ये हमासचे दहशतवादी लपून बसले असल्याचा इस्त्रायलच्या लष्कराचा दावा आहे. रुग्णालयाच्या परिसरात इस्राईलचे रणगाडे दिसत असून मोठ्या प्रमाणावर गोळीबारही सुरु असल्याचे या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. हमासला लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांचा आणि त्यांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या रुग्णालयांचा बळी जात असल्याची टीका जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे.
समुद्रातून भारताकडे येणाऱ्या एका मालवाहतूक करणाऱ्या जहाजावर येमेनमधील हौथी बंडखोरांनी सोमवारी हल्ला करत ते ताब्यात घेतले. हे जहाज इस्रायलमधील एका कंपनीच्या मालकीचे आहे. या जहाजावरील २५ कर्मचाऱ्यांनाही बंडखोरांनी ओलीस ठेवले आहे. इस्रायलशी संबंध असल्यानेच जहाजावर हल्ला केल्याचे आणि यापुढेही असे हल्ले करणार असल्याची माहिती हौथी बंडखोरांनी दिली आहे.
(हेही पहा – Uttarkashi Tunnel Accident : तब्बल ९ दिवसांनंतर पहिल्यांदा मजुरांनी मिळाली खिचडी, पाईपद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा )