Israel-Hamas Conflict: इस्त्रायल लष्कराला अल शिफा रुग्णालयात सापडला ‘दहशतवादी बोगदा’, ‘x’वर व्हिडियो शेअर करून दिली महत्त्वाची माहिती

या बोगद्याच्या प्रवेशद्वारावरच विविध लष्करी कारवाया करणारी यंत्रे होती.

172
Israel-Hamas Conflict: इस्त्रायल लष्कराला अल शिफा रुग्णालयात सापडला 'दहशतवादी बोगदा', 'x'वर व्हिडियो शेअर करून दिली महत्त्वाची माहिती
Israel-Hamas Conflict: इस्त्रायल लष्कराला अल शिफा रुग्णालयात सापडला 'दहशतवादी बोगदा', 'x'वर व्हिडियो शेअर करून दिली महत्त्वाची माहिती

गाझा पट्टीतील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या अल शिफा रुग्णालयाला इस्त्रायलने गेल्या काही दिवसांपासून लक्ष्य केलं आहे. या बोगद्याबाबत इस्त्रयलने ‘X’वर एका पोस्टद्वारे माहिती दिली आहे. (israel-hamas-conflict) या बोगद्यात इस्त्रायलमधील नागरिकांना ओलीस ठेवले असल्याचा दावाही केला होता.

गाझामधील शिफा रुग्णालयाच्या खाली इस्रायली सैन्याला 55 मीटर लांबीचा दहशतवादी बोगदा सापडला. इस्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) आणि इस्रायल सिक्युरिटीज अथॉरिटीने (आयएसए) यासंदर्भात खुलासा केला असून हा बोगदा १० मीटर खोल आणि ५५ मीटर लांब आहे.

सोशल मीडिया Xवर (पूर्वीचे ट्विटर) एका पोस्टमध्ये याविषयी माहिती दिली आहे. आय. डी. एफ. ने लिहिले, आय. डी. एफ. (Israel Defense Forces) आणि आय. एस. ए. यांच्यामार्फत राबवल्या गेलेल्या ऑपरेशननुसार हा बोगदा ५५ मीटर लांब आणि १० मीटर खोल आहे. दहशतवादी बोगदा शिफा रुग्णालयात सापडला. या बोगद्याच्या प्रवेशद्वारावरच विविध लष्करी कारवाया करणारी यंत्रे होती. इस्त्रायली लष्कराला रोखण्यासाठी येथे ब्लास्टप्रुफ दरवाजा, फायरिंग होलसारख्या सुरक्षा यंत्रणाही होत्या. गेल्या चार आठवड्यांपासून आम्ही सांगत आहोत की, गाझातील नागरिक आणि अल शिफा रुग्णालयातील रुग्णांना हमासने मानवी ढाल म्हणून वापरलं आहे. हा त्याचा पुरावा आहे, असंही त्यांनी यामध्ये म्हटलं आहे.

“हा दरवाजा हमास दहशतवादी संघटनेद्वारे इस्रायली सैन्याला कमांड सेंटर्समध्ये आणि हमासच्या भूमिगत मालमत्तेत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी वापरला जातो”, असे लष्करी निवेदनात म्हटले आहे. परंतु, या दरवाजापलिकडे काय आहे, याबाबत स्पष्टता करण्यात आलेली नाही.

हमासने अल शिफा रुग्णालयातील बोगद्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. संपूर्ण पॅलेस्टिनी एन्क्लेव्हमध्ये शेकडो किलोमीटरचे गुप्त बोगदे, बंकर आणि एॅक्सेस शाफ्टचे जाळे आहेत. या रुग्णालयातील हा बोगदाही नागरी पायाभूत सुविधांपैकी एक आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.