इस्त्राईलने बुधवारी, १९ मे रोजी गाजा पट्टीवर केलेल्या हल्ल्यात किमान सहा जणांचा मृत्यू झाला तर तीन डझनहून अधिक सदस्य संख्या असलेले घर या बॉम्बहल्ल्यात उद्धवस्त झाले. २५ मिनिटांत ५२ लढाऊ विमानांच्या सहाय्याने हमासच्या ४० ठिकाणी बॉम्बहल्ले करण्यात आले. त्यामध्ये दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.
तीन डझन सदस्य संख्या असलेल्या खान युनूस भवन या घरावर आधी एक छोटे रॉकेट सोडण्यात आले, त्यामुळे घरातील सगळे सदस्य घरातून बाहेर पळून गेले, त्यानंतर त्या घरावर जोरदार हल्ला करून घर उद्ध्वस्त करण्यात आले. इस्त्राईल सैन्याने सांगितल्याप्रमाणे त्यांनी खान युनूस भवन आणि दहशतवाद्यांच्या केंद्राला लक्ष्य केले. हमासच्या अल-अक्सा रेडिओने म्हटले हि, गाजा शहरावर हल्ल्यात त्यांच्या एका पत्रकाराचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. शिफा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले कि, बुधवारी ५ मृतदेह सापडले.
अमेरिकेचा इस्राईलवर युद्ध बंदीसाठी दबाव!
अमेरिकेचे अधिकारी यांनी सांगितले कि, बायडन प्रशासन इस्राईलवर गाजा पट्टीवरील हल्ला थांबवण्यासाठी आग्रह करत आहे. मात्र इस्त्राईल अद्याप ऐकण्याच्या मनस्थितीत नाही.
(हेही वाचा : महत्त्वाची माहितीः कोरोना झाल्यानंतर कधी घेता येणार लस? आरोग्य मंत्रालयाच्या राज्यांना नव्या सूचना)
लवकरच शांती प्रस्थापित होणार! – इस्राईल
इस्राईलचे पंतप्रधान नेत्यान्याहू म्हणाले कि, इस्राईलला लवकरच शांती प्रस्थापित होईल, अशी आशा आहे, परंतु हल्ले अधिक तीव्र करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या आम्ही शत्रूला जिंकण्याचा मनीषा बाळगत नाही, केवळ त्यांना रोखत आहोत, मात्र म्हणून आमची मनीषा बदलूही शकते, असा गर्भित इशाराही दिला.
शेकडो लोकांचा मृत्यू झाला!
गाजाच्या आरोग्य मंत्रालयानुसार इस्राईलच्या हवाई हल्ल्यात कमीत कमी २१९ फिलीस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये ६३ लहान मुले आणि ३६ महिलांचा समावेश होता. या हल्ल्यात १,५३० जण घायाळ झाले. हमास आणि इस्लामिक दहशतवाद्यांनी त्यांच्या २० मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगितले, मात्र इस्राईलने हा आकडा १३० आहे, असा दावा केला आहे.
Join Our WhatsApp Community