इस्त्राईल-हमास संघर्ष पेटला! 

इस्राईल आणि हमास यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. गाजा हा मोठ्या संख्येने सीमेवर सैनिक तैनात करत आहे. संभाव्य आक्रमणासाठी ९ हजार सैनिकांना तयार राहण्याचा आदेश दिला आहे, असे इस्राईलने सांगितले.  

80

इस्राईल आणि हमास यांच्यातील संघर्ष वाढताना दिसत आहे. इस्त्राईलने गाजा पट्टीत जमिनीच्या खाली खोदण्यात आलेल्या भुयारांना लक्ष्य करून ते नष्ट केले. त्यावेळी इस्राईलने भीषण बॉम्ब हल्ला केला. यात हमासची अनेक ठिकाणे उद्ध्वस्थ झाली. हा हल्ला किमान ४० मिनिटे करण्यात आला.

हमासनेही इस्राईलच्या येरुसलम आणि तेल अवीव यासह काही शहरांवर रॉकेट हल्ला केला. या दरम्यान इस्राईलने म्हटले कि, लेबनॉननेही रॉकेट हल्ला केला आहे. लेबनॉनने मात्र याचे खंडण केले आहे. या हल्ल्यात ११९ जण ठार झाले असून यात लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे. तर ८३० हून अधिक घायाळ झाले.

पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा! 

इस्राईलचे पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले कि, आमचा हेतू सध्या होण्यासाठी काही काळ अधिक लागणार आहे, मात्र यावेळी हमासला कायमचा धडा शिकवला जाईल, असा इशारा दिला.

संघर्ष आणखी पेटणार! 

याआधी १४ मे रोजी इस्राईलच्या वायुसेनेने हमासच्या आंतरिक सुरक्षा मुख्यालयासह आयुध भांडारवर हल्ला केला. सेनेच्या प्रसिद्ध पत्रकावरून मिळालेल्या माहितीनुसार, वायुसेनेने लढाऊ विमानांच्या साहाय्याने हल्ला केला. इस्राईल आणि हमास यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. गाजा सीमेवर मोठ्या संख्येने सैनिक तैनात करत आहे. संभाव्य आक्रमणासाठी ९ हजार सैनिकांना तयार राहण्याचा आदेश दिला आहे, असेही इस्राईलने सांगितले.

(हेही वाचा : आता म्युकरमायकोसिसच्या औषधाचा काळाबाजार?)

यहुदी-अरबी यांच्यात हिंसा वाढणार! 

या संघर्षात इस्राईलमध्ये दशकानंतर यहुदी-अरबी यांच्यातील हिंसेला पुन्हा चालना मिळाली आहे. लेबनॉनकडून दिवस-रात्र रॉकेट हल्ला करण्यात आला. यामुळे इस्राईलच्या उत्तरी सीमेवर या युद्धात तिसरा देश सहभागी झाल्याने हे युद्ध आणखी पेटणार आहे. हमासमधील एक वरिष्ठ निर्वासित नेता सालेह अरुरी याने लंडनच्या एका टीव्ही चॅनलला मुलाखत देताना सांगितले कि, आम्ही युद्ध विराम करण्याचा प्रस्ताव धुडकावून टाकला आहे. मिस्र, कतार आणि संयुक्त राष्ट्र हे युद्ध विराम करण्यासाठी मध्यस्थी करत आहेत. मात्र त्यांना यात अद्याप यश प्राप्त झाले नाही.

१०० फिलीस्तानी ठार झाल्याचा दावा 

गाजाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यावरील हल्ल्यात किमान १०० फिलीस्तानी ठार झाले आहेत. त्यामध्ये २८ लहान मुले आणि १५ महिलांचा समावेश आहे. मात्र हमास आणि इस्लामिक दहशतवाद्यांनी २० जण ठार झाल्याचे म्हटले आहे. या दरम्यान हमासचा सैन्य प्रवक्ता अबू उबेद म्हणाले कि, आम्ही या हल्ल्याने घाबरलेलो नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.