इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांनी संयुक्तपणे हायपरसॉनिक व्हेइकल ट्रायल्सची चाचणी केली. या चाचण्यांमध्ये आवश्यक ते सर्व मापदंड साध्य झाले आणि उच्च कार्यक्षमता दिसून आली. या व्हेईकलचे वैशिष्ट्य म्हणजे ते ध्वनीच्या पाचपट वेगाने भरारी घेते. या चाचणीनंतर भारताच्या संरक्षण क्षेत्राला अधिक बळ मिळेल. विशेषत: पाकिस्तान आणि चीनचे डावपेच हाणून पाडण्यासाठी हे महत्त्वाचे शस्त्र ठरणार आहे.
(हेही वाचा – ऑनलाईन व्यवहार करताय? UPI पेमेंटसाठी आता Paytm, GPay, PhonePe वर मर्यादा; किती असणार लिमिट?)
हायपरसॉनिक व्हेइकल अंतराळात जलद प्रवेश, लांब पल्ल्याचा लष्करी प्रतिसाद आणि व्यावसायिक हवाई प्रवास करण्यास सक्षम आहे. हायपरसॉनिक व्हेइकल हे विमान, अंतराळयान किंवा क्षेपणास्त्र असू शकते.
हायपरसॉनिक हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. अमेरिकन काँग्रेसमध्ये सादर करण्यात आलेल्या एका अहवालानुसार भारत रशियासोबत हायपरसॉनिक मिसाइल बनवण्यात भागीदार आहे. या वर्षी रशियाने युक्रेन युद्धात किंजल नामक हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा वापरले असल्याचेही सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community