PSLV-C54: इस्रो गगन भरारीसाठी सज्ज! ‘या’ दिवशी लाँच करणार 8 नॅनो सॅटेलाईट

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो आता आणखी एका गगन भरारीसाठी सज्ज झाले आहे. येत्या 26 नोव्हेंबर रोजी इस्त्रो 8 नॅनो उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे. आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून PSLV-C54 इओएस 06 रॉकेट लाँच करण्यात येणार आहे. या रॉकेटमधून ओशनसॅट 3 उपग्रह आणि 8 नॅनो उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येईल. येत्या शनिवारी सकाळी 11 वाजून 56 मिनिटांनी PSLV-C54 हे रॉकेट लाँच करण्यात येणार आहे.

26 नोव्हेंबररोजी सकाळी 11 वाजून 56 मिनिटांनी PSLV-C54 रॉकेटमधून इओएस 06 आणि 8 छोटे सॅटेलाईट लॉंच करण्यास येतील. यामध्ये पिक्सेलमधून आनंद आणि भूटानसॅट, ध्रुव अंतराळामधून दोन थायबोल्ट तर स्पेसफ्लाईट युएसमधून 4 अशा एकूण 8 छोट्या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – ‘या राज्यपालांना कोठे पाठवायचे तिथे पाठवा पण…’; शिंदे गटाने केली ‘ही’ मागणी)

18 नोव्हेंबर रोजी पहिलं खासगी रॉकेट विक्रम एसचे यशस्वी उड्डाण झाले. इस्त्रोकडून मिशन प्रारंभ अंतर्गत विक्रम एस या हायपरसोनिक रॉकेट लाँच करण्यात आले. हे लाँच करण्यात आलेले भारताचे पहिले खासगी रॉकेट असून देशात खासगी रॉकेट विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. हैदराबादच्या स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीकडून विक्रम एस या रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here