भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) रविवारी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून आपले पहिले छोटे उपग्रह SSLV-D1 प्रक्षेपित केले. SSLV-D1 ने 750 विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘आझादी सॅट’ आणि पृथ्वी निरीक्षण उपग्रह-02 (EOS-02) उपग्रह देखील प्रक्षेपित केला. 110 किलो वजनाचे SSLV हे तीन टप्पे असलेले रॉकेट आहे, ज्याचे सर्व भाग घन अवस्थेचे आहेत. हे केवळ 72 तासांत एकत्र केले जाऊ शकते. तर उर्वरित प्रक्षेपणाला सुमारे दोन महिने लागतात.
SSLV-D1/EOS-02 Mission: Maiden flight of SSLV is completed. All stages performed as expected. Data loss is observed during the terminal stage. It is being analysed. Will be updated soon.
— ISRO (@isro) August 7, 2022
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त ग्रामीण भारतातील सरकारी शाळांच्या विद्यार्थिनींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या मदतीने हे बनवले आहे. स्पेस किड्स इंडियाच्या विद्यार्थ्यांच्या टीमने एका प्रणालीची रचना केली जी उपग्रहाकडून डेटा प्राप्त करणार आहे. हा उपग्रह नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे जो वनीकरण, कृषी, भूविज्ञान आणि जलविज्ञान यांसारख्या क्षेत्रात काम करणार आहे.
(हेही वाचा- BEST ची ‘Hop on- Hop off’ बस सेवा आता CSMT वरून सुरू)
मायक्रो-क्लास EOS-02 उपग्रहामध्ये प्रगत ऑप्टिकल रिमोट सेन्सिंग आहे. हे इन्फ्रारेड बँडमध्ये कार्यरत आहे आणि उच्च अवकाशीय रिझोल्यूशनसह येत आहे, त्याचे वजन 142 किलो आहे. EOS-02 10 महिने अंतराळात कार्यरत असेल. आझादी सॅट हे आठ किलोचे क्यूबसॅट असून, त्यात सरासरी 50 ग्रॅम वजनाची 75 उपकरणे आहेत.