पाकिस्तानात (Pakistan) बलुच लिबरेशन आर्मीने (Baloch Liberation Army) यांची चळवळ जोर धरू लागली आहे. ही संघटना बलूच प्रदेशाला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळावे या मागणीसाठी कायम पाकिस्तान सरकार आणि लष्कराच्या विरोधात उग्र आंदोलन करत असते. मंगळवारी या संघटनेने जाफर एक्स्प्रेस हायजॅक केली. त्यावेळी या ट्रेनमधून पोलीस, लष्कर आणि आयएसआयचे अधिकारी प्रवास करत होते. या ट्रेनमधून शेकडो प्रवासी करत होते. त्या सर्वांना ओलीस ठेवण्यात आले आहे.
(हेही वाचा केरळमध्ये Love jihad मुळे ४०० मुली बेपत्ता झाल्या; भाजपा नेत्याचा धक्कादायक दावा)
ही ट्रेन हायजॅक केल्याची माहिती बलुच लिबरेशन आर्मीने स्वतः सोशल मीडियावर दिली आहे. पाकिस्तानी (Pakistan) सैन्य या ओलीसांची सुटका करण्याचे प्रयत्न करत आहे. पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथून खैबर पख्तूनख्वामधील पेशावरकडे जाफर एक्सप्रेस जात असताना ही घटना घडली. पाकिस्तानी (Pakistan) सैन्याने कोणत्याही लष्करी कारवाईचा प्रयत्न केला, तर सर्व ओलीसांना ठार मारू आणि या मृत्यूची जबाबदारी संपूर्णपणे लष्करावर राहील, अशी धमकीही दिली आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने एक निवेदन जारी करून म्हटले की, आमच्या सैनिकांनी आधी रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवून दिला, त्यानंतर ट्रेन थांबताच ताब्यात घेतले. ओलिसांमध्ये पाकिस्तानी (Pakistan) लष्कर, पोलीस, दहशतवाद विरोधी दल (एटीएफ) आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) चे सक्रिय कर्तव्य कर्मचारी देखील आहेत. हे सर्व सुट्टीवर पंजाबला जात होते. बलुच लिबरेशन आर्मीने सांगितले की, आतापर्यंत सहा जवानांना ठार केले आहे.
Join Our WhatsApp Community