मंगळवारी पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने जाफर एक्सप्रेस (Jaffar Express train) ट्रेनचे अपहरण केले. यावेळी झालेल्या गोळीबारात एक रेल्वे चालक जखमी झाला. लेव्ही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाफर एक्सप्रेसच्या नऊ बोग्यांमध्ये ४०० हून अधिक प्रवाशांना घेऊन, क्वेट्टाहून खैबर पख्तूनख्वामधील पेशावरकडे जात असताना कच्छ जिल्ह्यातील पेरू कानरी भागात तिच्यावर गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी रेल्वे ट्रॅक उडवून दिला आणि नंतर ४०० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ट्रेनवर गोळीबार केला. या हल्ल्यानंतर सुरक्षा अधिकारी आणि ट्रेनमधील हल्लेखोरांमध्ये जोरदार गोळीबार झाला. त्यात 20 सैनिक ठार झाले आहेत.
बीएलएने निवेदन जारी
या घटनेनंतर, बलुच लिबरेशन आर्मीचे प्रवक्ते जियांद बलोच यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) च्या सैनिकांनी जाफर एक्सप्रेस (Jaffar Express train) ताब्यात घेतल्यानंतर १८२ लोकांना ओलीस ठेवले आहे. आतापर्यंत अकरा पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत आणि एक ड्रोन देखील पाडण्यात आला आहे. बीएलएच्या सैनिकांचे जाफर एक्सप्रेसवर पूर्ण नियंत्रण आहे.” बीएलएने स्पष्ट केले आहे की अपहरणकर्त्यांमध्ये पाकिस्तानी लष्कर, पोलिस, आयएसआय आणि एटीएफचे सक्रिय कर्मचारी होते, जे सर्व रजेवर प्रवास करत होते.
(हेही वाचा Infiltrators : घुसखोरांपासून देश सुरक्षित करण्यासाठी येणार नवा कायदा? काय आहेत वैशिष्ट्ये?)
बीएलएने शेकडो प्रवाशांना सोडले
नागरी प्रवाशांना, विशेषतः महिला, मुले, वृद्ध आणि बलुच नागरिकांना सुरक्षितपणे सोडण्यात आले आहे आणि त्यांना सुरक्षित मार्ग देण्यात आला आहे. जर लष्करी हस्तक्षेप सुरूच राहिला तर सर्व ओलिसांना मारले जाईल असा इशारा बीएलएने दिला.
Join Our WhatsApp Community