जम्मू – काश्मीरमधील शोपियानमधील द्रास भागात मंगळवारी संध्याकाली सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक आली. दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु झाल्यावर भारतील सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर दिले. यात सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवाही ठार झाल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे.
( हेही वाचा : दसऱ्यानिमित्त भिवंडी, कळवा शहरातील वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग)
सुरक्षा दलाला मोठे यश
हे तिन्ही दहशतवादी स्थानिक असून ते जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. जम्मू -काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारले गेलेले दोन्ही दहशतवादी हनान बिन याकुब आणि जमशेद हे (एसपीओ) जावेद दार आणि पश्चिम बंगालमधील एका मजूराच्या हत्येत सामील होते. २ ऑक्टोबरला दहशतवाद्यांनी एसपीओची हत्या केली होती. याशिवाय या दहशतवाद्यांनी 24 सप्टेंबर रोजी दहशतवाद्यांनी बंगालमधील एका मजुराची हत्या केली होती, तेव्हापासून या दहशतवाद्यांचा शोध सुरू होता. परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला तेव्हा शोधमोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
Join Our WhatsApp Community