पाकिस्तानमध्ये आणखी एकाला लक्ष्य करून ठार करण्यात आले आहे. यावेळी ठार झालेला कुख्यात दहशतवादी हाफिज सईदचा नातेवाईक आणि लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख निधी संकलनकर्ता कारी शहजादा (Qari Shahzad) हा आहे. त्याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. सोमवारी सकाळच्या नमाजासाठी मशिदीत जात असताना त्याच्यावर हा हल्ला झाला.
शहजाद (Qari Shahzad) हा कराचीतील खैराबाद येथील जमियत-ए-उलेमा इस्लाम (जेयूआय-एफ) चा सदस्य होता. मागील काही दिवसांपासूनची ही पाचवी हत्या आहे. कराचीमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी लष्कर-ए-तोयबाचा याआधी एक दहशतवादी अदनान अहमद याची गोळ्या घालून हत्या केली होती. पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना सतत त्यांच्या हत्येचा धोका निर्माण झाला आहे. अशावेळी आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला आता या दहशतवाद्यांना सुरक्षा पुरवण्याचे आव्हानात्मक काम करावे लागत आहे. (Qari Shahzad)
या हल्ल्यामुळे जनतेत संताप निर्माण झाला आहे. प्रार्थना करण्यासाठी जात असताना या नेत्याची (Qari Shahzad) हत्या झाली. ही घटना पाकिस्तानी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. हे हल्ले रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे आता पाकिस्तानी लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांवर टीका होऊ लागली आहे. पाकिस्तानी राजकीय नेत्यांनीही कारी शहजादच्या (Qari Shahzad) हत्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Join Our WhatsApp Community