राजौरीजवळील (Rajouri Encounter) बाजीमल जंगल भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्य चकमकीत स्पेशल फोर्सेसच्या दोन कॅप्टनसह एकूण ५ जवानांचा बळी घेणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केला आहे.
या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर आणि पाकिस्तानी नागरिक कारी याचा समावेश आहे. कॅप्टन प्रांजल, कॅप्टन शुभम गुप्ता, हवालदार अब्दुल माजिद, लान्स नाईक संजय बिश्त, पॅराट्रुपर सचिन लौर हे ५ जवान या चकमकीत हुतात्मा झाले.
(हेही वाचा – Email Threat : “एक मिलियन डॉलर बिटकॉईन द्या, नाहीतर… ; मुंबई विमानतळाच्या मेलआयडीवर धमकीचा ईमेल )
बुधवारी एका मशिदीत लपलेल्या दहशतवाद्यांना कोंडीत पकडल्यावर प्रत्यक्ष चकमक सुरू झाली. शुक्रवारी, २४ नोव्हेंबरला केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी हुतात्मा शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community