जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) श्रीनगर (Srinagar District) जिल्ह्यात रविवारी (३ नोव्हें.) बाजारात झालेल्या ग्रेनेड स्फोटात (Grenade Blast)12 जण जखमी झाले आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी (Terrorists) टीआरसीजवळील (TRC) गर्दीच्या बाजारपेठेत ग्रेनेड फेकले, त्यात १२ जण जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. (Jammu and Kashmir)
(हेही वाचा-Isis चे दहशतवादी कनेक्शन उघड करणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘दक्षता पदक’ जाहीर!)
घटनेनंतर लगेचच सुरक्षा दलांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसराची नाकाबंदी केली. या हल्ल्याशी संबंधित अधिक माहिती गोळा करण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, प्राथमिक माहितीनुसार जखमींचा आकडा वाढू शकतो. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत सुरक्षा व्यवस्था कडक केली. (Jammu and Kashmir)
हल्लेखोरांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या हल्ल्यात 12 नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर काश्मीर पोलिसांचे स्पेशल ऑपरेशन ग्रुप तपासासाठी तैनात करण्यात आले आहे. याशिवाय हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. (Jammu and Kashmir)
(हेही वाचा-मुख्यमंत्री Yogi Adityanath यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणीला ठाण्यातून अटक!)
काल श्रीनगरच्या अनंतनाग आणि खानयारमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली, ज्यामध्ये तीन दहशतवादी ठार झाले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानस्थित लष्कराच्या एका वरिष्ठ कमांडरचाही समावेश आहे, जो मोठी घटना घडवण्यासाठी परिसरातील एका घरात लपून बसला होता. (Jammu and Kashmir)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community