जम्मू-काश्मीरमधील (Jammu And Kashmir) कुपवाडा (Kupwara) जिल्ह्यातील गुगलधरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला. लष्कर आणि पोलिसांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने सांगितले की, शुक्रवार, 4 ऑक्टोबर रोजी लष्कर आणि पोलिसांनी एक संशयास्पद क्रियाकलाप पाहिला. यानंतर संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली.
(हेही वाचा-“तुम्ही संरक्षक जाळ्या नसलेल्या इमारतींवरून…”, झिरवळांनी केलेल्या कृतीवर Raj Thackeray यांचा टीका)
यादरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. सध्या कारवाई सुरू आहे. यापूर्वी 28 सप्टेंबर रोजी कठुआ जिल्ह्यातील बिलवार तहसीलमधील कोग-मंडली येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यात जम्मू-काश्मीर पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल बशीर अहमद हुतात्मा झाले. चकमकीच्या दुसऱ्या दिवशी एक दहशतवादी मारला गेला. (Jammu And Kashmir)
(हेही वाचा-Religious Sites in Dharavi : धारावीतील धार्मिक स्थळांच्या पुनर्वसनासाठी समिती स्थापन)
शनिवार, २८ सप्टेंबर रोजी कुलगामच्या आदिगाम देवसर भागातही चकमक झाली. यामध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या गोळीबारात लष्कराचे चार जवान आणि कुलगामचे एएसपी जखमी झाले होते. (Jammu And Kashmir)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community