Jammu and Kashmir मध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर; ३ दहशतवादी ठार

106
Jammu and Kashmir मध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर; ३ दहशतवादी ठार
Jammu and Kashmir मध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर; ३ दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) पहाटे दहशतवादी आणि लष्करात चकमक झाली. त्यानंतर कुपवाडामध्ये (Kupwara) लष्कर आणि पोलिसांनी संयुक्तपणे घुसखोरीविरोधी मोहीम सुरू केली. जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ झालेल्या दोन कारवाईत तीन घुसखोर ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचा –Passport Portal Shut: पासपोर्ट काढताय तर थांबा! आजपासून 5 दिवस देशभरात पोर्टल राहणार बंद)

एक दहशतवादी तंगधारमध्ये ठार झाला आहे. तर, इतर दोन दहशतवाद्यांना मच्छल जिल्ह्यात कंठस्नान (Encounter) घातले गेले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले आहे. 28-29 ऑगस्टच्या मध्यरात्री तंगधार भागात ही कारवाई करण्यात आली. (Jammu and Kashmir)

दहशतवादी घुसखोरीचा कट आखत असल्याची गुप्तचर भारतीय लष्कराला मिळाली होती. त्यानंतर ऑपरेशन सुरू केले. दहशतवादी मारल्यानंतरही अजून मोहीम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 28 ऑगस्ट रोजी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकानंतर जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात शोध मोहीम राबवली जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 28 ऑगस्ट रोजी रात्री 9:30 वाजता खेरी मोहरा लाठी आणि दंथाल परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली. (Jammu and Kashmir)

(हेही वाचा –उभारण्यात येणारा शिवरायांचा नवा पुतळा लौकिकाला साजेसा हवा, पैसा कमी पडू देणार नाही: CM Eknath Shinde)

लष्कराच्या उत्तरी कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचिंद्र कुमार यांच्यासह 16 कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल नवीन सचदेवा यांनी सुंदरबनी सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरील ठिकाणांना भेट दिली आणि सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांना सुरक्षा दलांमधील समन्वय आणि प्रदेशातील ऑपरेशनल तयारीबद्दल माहिती देण्यात आली. आर्मी कमांडरने फॉर्मेशनच्या सहाय्यक युनिट्सनाही भेट दिली. (Jammu and Kashmir)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.