Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरच्या मच्छल सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत २ दहशतवादी ठार

133
Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरच्या मच्छल सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत २ दहशतवादी ठार
Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरच्या मच्छल सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत २ दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) मच्छल सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. भारतीय जवानांनी कुपवाडा येथे दहशदवाद्यांचा एलओसीजवळ घूसखोरी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला.

मच्छल सेक्टरमध्ये चकमक सुरू झाली असून या चकमकीत आतापर्यंत २ दहशतवादी ठार झाले आहेत. ऑपरेशन चालू आहे, कुपवाडा पोलिसांनी (Kupwara Police) ही माहिती दिली असून काश्मीर झोन पोलिसांनी ‘X’वर याविषयी लिहिले आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांसह संयुक्त कारवाईत भारतीय सैन्याच्या जवानांनी कुपवाडा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घूसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न कुपवाडा पोलिसांनी हाणून पाडला.

“26 ऑक्टोबर 23 रोजी #IndianArmy, @JmuKmrPolice आणि गुप्तचर संस्थांनी सुरू केलेल्या संयुक्त ऑपरेशनमध्ये, #कुपवाडा सेक्टरमध्ये #LoC वर सतर्क सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. ऑपरेशन्स प्रगतीपथावर आहेत,” असे भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने Xवर सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.