Jammu and Kashmir : किश्तवाड चकमकीनंतर सापडलेल्या वस्तूंवर पाकिस्तानचा पत्ता !

59
Jammu and Kashmir : किश्तवाड चकमकीनंतर सापडलेल्या वस्तूंवर पाकिस्तानचा पत्ता !
Jammu and Kashmir : किश्तवाड चकमकीनंतर सापडलेल्या वस्तूंवर पाकिस्तानचा पत्ता !

जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) किश्तवाड जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी रात्री उशिरा झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यानंतर झालेल्या शोध मोहिमेत, सुरक्षा दलांनी शनिवारी १ एम४ रायफल, २ एके४७ रायफल, ११ मॅगझिन, ६५ एम४ गोळ्या आणि ५६ एके४७ गोळ्या, तसेच टोप्या, औषधे, प्रथमोपचार साहित्य आणि मोजे जप्त केले. (Jammu and Kashmir)

हेही वाचा-Bhushan Gavai : महाराष्ट्राचे भूषण गवई होणार सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश !

औषधांवर पाकिस्तान आणि लाहोरचा पत्ता लिहिलेला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मारले गेलेले तिन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे होते. त्यात टॉप कमांडर सैफुल्लाहचाही समावेश होता. त्याचवेळी, शनिवारी जम्मू जिल्ह्यातील अखनूर येथे झालेल्या चकमकीत ९ पंजाब रेजिमेंटचे जेसीओ कुलदीप चंद हुतात्मा झाले. शुक्रवारी रात्री उशिरा येथे ही चकमक सुरू झाली. लष्कराने X वर पोस्ट करून ही माहिती दिली होती. (Jammu and Kashmir)

हेही वाचा- Myanmar Earthquake : म्यानमार पुन्हा एकदा जोरदार भूकंपाने हादरलं !

१ एप्रिल रोजी नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात ३ सुरुंगांचे स्फोट झाले आणि पाकिस्तानकडून गोळीबार झाला. याच वेळी दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने गोळीबार करून प्रत्युत्तर दिले. ज्यामध्ये ४ ते ५ घुसखोर मारले गेले. (Jammu and Kashmir)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.