जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) सुरक्षा दलांच्या दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान एका दहशतवाद्याला ठार मारण्यासाठी चक्क बिस्किटाचा वापर करण्यात आला. ही मोहीम केवळ धोरणात्मक नियोजनच नव्हे, तर कल्पकतेने करण्यात आली.
(हेही वाचा – Canada: कॅनडातील हिंदू मंदिरावर खलिस्तानींचा हल्ला; VIDEO व्हायरल)
स्थानिक पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने अतिशय चतुराईने केलेल्या संयुक्त कारवाईत दहशतवादी संघटना लष्कर ए तैयबाचा (एलईटी, Lashkar-e-Taiba) पाकिस्तानी कमांडर उस्मानला श्रीनगरमधील खान्यार भागात दिवसभर झालेल्या चकमकीत ठार करण्यात आले. ही कारवाई करतांना बेवारस कुत्रे भुंकून दहशतवादी सावध होण्याची भीती होती. त्यामुळे सुरक्षा दलाने कुत्र्यांना बिस्किटे खाऊ घातली. त्यामुळे कुत्रे न भुंकल्याने दहशतवादी बेसावध राहिले. यामुळेच या कारवाईत बिस्किटांना मोठे महत्त्व आले आहे.
सुरक्षा दलांना लक्ष्य करणाऱ्या एलईटीची उपसंघटना ‘द रेजिस्टेंस फ्रंट’विरोधात सुरक्षा दलाने यशस्वी केलेली ही मोहीम महत्त्वाची आहे. सुरक्षा दल सकाळच्या नमाजापूर्वीच परिसरात तैनात करण्यात आले. या वेळी जवळपास ३० घरांना सुरक्षा दलाने वेढा घातला होता. अनेक तासांच्या या चकमकीनंतर उस्मानला ठार मारण्यात सुरक्षा दलाला यश आले. या चकमकीत चार जवान जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (Jammu and Kashmir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community