Jammu and Kashmir : मोदी सरकारच्या कार्यकाळात दहशतवाद्यांचे कबरडे मोडले; २०१४ मध्ये २२२ हल्ले तर २०२४ मध्ये फक्त २३ दहशतवादी हल्ले

जम्मू-काश्मीरमधील विकास कामे आणि कलम ३७० हटवणे ठरले लाभदायी

124
Jammu and Kashmir : मोदी सरकारच्या कार्यकाळात दहशतवाद्यांचे कबरडे मोडले; २०१४ मध्ये २२२ हल्ले तर २०२४ मध्ये फक्त १५ दहशतवादी हल्ले
Jammu and Kashmir : मोदी सरकारच्या कार्यकाळात दहशतवाद्यांचे कबरडे मोडले; २०१४ मध्ये २२२ हल्ले तर २०२४ मध्ये फक्त १५ दहशतवादी हल्ले

जम्मू काश्मीरमधील (Jammu and Kashmir) दहशतवादी हल्ले रोखण्यात सुरक्षा दलांना गेल्या १० वर्षात मोठे यश आले आहे. आकडेवारी नुसार, जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये घट झालेली आहे. सुरक्षा दलांचे ही २०१४ नंतर तुलनेने कमी नुकसान झालेले आहे. या बदलामागे मोदी सरकारने (modi government) जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० (Article 370) हटवण्याचा घेतलेला निर्णय आणि अनेक विभाग झालेली विकास कामे कारणीभूत आहेत. मात्र जम्मू काश्मीरमध्ये २०१० च्या तुलनेने मतदानांची टक्केवारीत घसरण झालेली आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये दि. २७ सप्टेंबरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) फक्त २३ दहशतवादी कारवाया झालेल्या आहेत. या हल्ल्यात ११ नागरिकांचा मृत्यू झाला असून हल्ल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांशी दहशतवाद्यांची चकमक झाली. ज्यामध्ये १७ जवान हुतात्मा झाले. मात्र सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल १० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. त्यामुळे जम्मूच्या तुलनेत अराजकता पसरलेल्या काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या (Terrorist attack) आकडेवारीत एक दशकात घट झालेली आहे.

काश्मीरमध्ये यावर्षी एकूण ८ दहशतवादी हल्ले (Terrorist attacks) झाले. ज्यामध्ये सुरक्षा दलाचे ४ जवान हुतात्मा झाले आहेत. तर या हल्ल्यात ५ नागरिकांचा ही मृत्यू झालेला आहे. मात्र सुरक्षा रक्षकांनी प्रत्युत्तरादाखल ३५ दहशतवाद्यांना ठार केले आहे.

२०१४ च्या दहशतवादी हल्ल्यांची आकडेवारी

१० वर्षांपूर्वी २०१४ मध्ये दहशतवादी कारावायांमुळे जम्मू काश्मीरमध्ये अराजकता पसरलेली होती. जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) मिळून एकूण २२२ दहशतवादी हल्ले (Terrorist attacks) झालेले होते. या हल्ल्यात सुरक्षा दलाच्या ४७ जवान हुतात्मा झाले आहेत. दरम्यान २९ नागरिकांचा ही मृत्यू झालेला आहे. मात्र सुरक्षा दलांनी ११० दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. पंरतु आता मोदी सरकारच्या (modi government) निर्णयामुळे जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.