Jammu-Kashmir मधील Doda जिल्ह्यात ३४ दिवसांत पाचवी चकमक; कॅप्टनसह ४ जवान हुतात्मा!

201
Jammu-Kashmir मधील Doda जिल्ह्यात ३४ दिवसांत पाचवी चकमक; कॅप्टनसह ४ जवान हुतात्मा!
Jammu-Kashmir मधील Doda जिल्ह्यात ३४ दिवसांत पाचवी चकमक; कॅप्टनसह ४ जवान हुतात्मा!

जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) डोडा जिल्ह्यातील धारी गोटे उरारबागीच्या जंगलात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराच्या कॅप्टनसह चार जवान हुतात्मा झाले आहेत. राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिस सोमवारपासून येथे शोध मोहीम राबवत होते. शोध सुरू असताना दहशतवादी गोळीबार करत पळून गेले. सैनिकांनी त्यांचा पाठलाग केला. घनदाट जंगलामुळे दहशतवादी सुरक्षा दलांना चकमा देत राहिले. (Jammu-Kashmir)

34 दिवसांतील ही पाचवी चकमक

सोमवारी रात्री नऊच्या सुमारास पुन्हा गोळीबार झाला. यामध्ये पाच जवान गंभीर जखमी झाले. यातील चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जम्मू विभागातील डोडा येथे 34 दिवसांतील ही पाचवी चकमक आहे. यापूर्वी 9 जुलै रोजी चकमक झाली होती. २६ जून रोजी येथे एक आणि १२ जून रोजी दोन हल्ले झाले. सर्व हल्ल्यांनंतर चकमकी झाल्या. (Jammu-Kashmir)

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिस प्रवक्त्याने चकमकीची पुष्टी केली, परंतु अधिक माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले. विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे, सोमवारी रात्री डोडा येथील उत्तर भागात भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू होती. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दहशतवादी तेथे होते आणि दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार करण्यात आला. (Jammu-Kashmir)

24 तासांपूर्वी तीन दहशतवाद्यांचा खात्मा

अवघ्या 24 तासांपूर्वी उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथे सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. नियंत्रण रेषेजवळ झालेल्या चकमकीत ठार झालेले दहशतवादी मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते. मात्र त्यापूर्वीच सतर्क पोलीस आणि लष्कराच्या जवानांनी त्यांचा हेतू हाणून पाडला. (Jammu-Kashmir)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.