Jammu Kashmir Terrorist : 500 पॅरा कमांडो दहशतवाद्यांना कंठस्नान घालणार; लष्कराचे विशेष पथक जम्मूला रवाना

246
Jammu Kashmir Terrorist : 500 पॅरा कमांडो दहशतवाद्यांना कंठस्नान घालणार; लष्कराचे विशेष पथक जम्मूला रवाना
Jammu Kashmir Terrorist : 500 पॅरा कमांडो दहशतवाद्यांना कंठस्नान घालणार; लष्कराचे विशेष पथक जम्मूला रवाना

अलीकडच्या काळात अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांनी जम्मू हादरले आहे. सामान्य लोक तसेच लष्करालाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. पाकिस्तानातून 50 ते 55 प्रशिक्षित दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी केल्याचे संरक्षण सूत्रांचे म्हणणे आहे. या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तसेच यासोबतच डोडाच्या जंगलात 500 पॅरा स्पेशल कमांडो तैनात करण्यात आले असून तेथे दहशतवादी लपून बसल्याचा संशय आहे. त्यांना ठार करण्यासाठी भारतीय लष्कराने आता संपूर्ण रणनीती बनवली आहे. (Jammu Kashmir Terrorist)

(हेही वाचा- Vidhan Sabha Election 2024 : बैठकांचे सत्र आणि जागा वाटपावरून रस्सीखेच)

पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर जम्मू प्रदेश अलर्ट मोडवर आला आहे. संरक्षण सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, दहशतवादाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी तेथे घुसलेल्या पाकिस्तानातील 50-55 दहशतवाद्यांना पकडण्यासाठी भारतीय लष्कराने पॅरा स्पेशल फोर्सचे सुमारे 500 कमांडो या भागात तैनात केले आहेत. ते म्हणाले की, गुप्तचर यंत्रणांनीही या भागात आपली यंत्रणा मजबूत केली आहे. (Jammu Kashmir Terrorist)

संरक्षण सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानच्या प्रॉक्सी आक्रमणाचा मुकाबला करण्यासाठी लष्कराने या भागात आधीच सुमारे 3,500-4000 सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ब्रिगेडसह सैन्य तैनात केले आहे. ते म्हणाले की, लष्करी अधिकारी अत्याधुनिक शस्त्रे आणि दळणवळणाच्या साधनांनी सुसज्ज दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांना नष्ट करण्याच्या रणनीतीवर काम करत आहेत. (Jammu Kashmir Terrorist)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.