जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir Terrorist Attack) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दहशतवाही हल्ल्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात मोठा हल्ला केला होता. त्या हल्ल्यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला होता तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते. आता पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यातील गुलमर्गजवळ (Gulmarg) दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. (Jammu Kashmir Terrorist Attack)
Terrorist attack on an Army vehicle which was part of a convoy in J&K’s Baramulla in which a civilian porter has been killed. Four soldiers have also been injured in the attack. More details awaited: Army Officials pic.twitter.com/WCI5pCa2RS
— ANI (@ANI) October 24, 2024
गुरुवारी (२४ ऑक्टो.) संध्याकाळी जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्गच्या नागिन भागात नियंत्रण रेषेजवळ 18 राष्ट्रीय रायफल्सच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 2 जवान हुतात्मा झाले असून 2 हमालांचा मृत्यू झाला आहे. सैन्याला मदत करण्यासाठी हमाल असतात, ते डोंगराळ भागात आणि पुढच्या चौक्यांमध्ये सामान पोहोचवण्यास मदत करतात. (Jammu Kashmir Terrorist Attack)
(हेही वाचा-निवडणुकीसाठी पंतप्रधान Narendra Modi यांच्या सभांचा धडाका; वाचा मोदींच्या महाराष्ट्रात किती सभा होणार ? )
या हल्ल्यात लष्कराचे 7 जवान जखमी झाले आहेत. सर्व जखमींना श्रीनगरमधील 92 बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात 3 हून अधिक दहशतवादी सहभागी असू शकतात. त्याचवेळी सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. उत्तर काश्मीरमधील बोटा पाथरी सेक्टरमध्ये एलओसीवरून दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असावी, असा अंदाज आहे. (Jammu Kashmir Terrorist Attack)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community