मागील अनेक दिवसांपासून जम्मू काश्मीर येथील काही भागात दहशतवादी हल्ले सुरू आहेत. अशीच एक घटना जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यामध्ये (Anantnag District) घडली असून, यामध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान हुतात्मा झाले आहे. तर तीन जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दहशतवाद्यांचे पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहे. (J&K Encounter)
(हेही वाचा – Shiv Sena-UBT : शिवसेनेच्या वाटचालीत उबाठाचा अडसर)
पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, अनंतनाग जिल्ह्यातील कोकरानाग (Kokarnag) येथील अहलान परिसरामध्ये दहशतवादी आणि लष्करादरम्यान, चकमक सुरू आहे. पोलीस आणि लष्कराच्या एका पथकाने गोपनीय माहितीच्या आधारावर अहलान येथे नाकाबंदी केली. तसेच शोधमोहीम हाती घेतली. (J&K Encounter)
(हेही वाचा – Hawkers In Andheri : अंधेरीतील ‘त्या’ फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी आंब्रे मैदानाखालील जागेत भूमिगत बाजार)
त्यांनी पुढे सांगितले की, शोधमोहिमेदरम्यान, लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षादलांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यामुळे चकमकीला तोंड फुटले. गोळीबार अद्यापही सुरू आहे. जम्मू काश्मीरमधून दहशतवाद (Kashmir terrorism) संपुष्टात आणण्यासाठी सुरक्षा दलांकडून दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. (J&K Encounter)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community