कर्नाटक पोलिसांच्या नक्षलविरोधी दलाने (ANF) उडपी जिल्ह्यातील करकला तालुक्यामधील कब्बिनाले गावात सोमवारी १८ नोव्हेंबर रात्री झालेल्या भीषण चकमकीत कुख्यात नक्षलवादी विक्रम गौडा (Vikram Gowda) याला ठार केले.
(हेही वाचा – Maharashtra Vidhan Sabha Election 2024: निवडणूक काळात सोशल मीडियावर सायबर पेट्रोलींग सुरू; २१ युझर्सना नोटीस बजावली)
नक्षलविरोधी शोध मोहिमेदरम्यान सीतांबेलू भागात नक्षलवादी आणि एएनएफ (ANF) टीममध्ये गोळीबार सुरू असताना ही चकमक झाली. नक्षल युनिटच्या संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर एएनएफच्या पथकाने ही कारवाई तीव्र केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, चिकमंगलूर जिल्ह्यातील जयपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षलद्यांनी एका दुर्गम घरात भेट दिली होती. यानंतर त्यांनी कोप्पा तालुक्यातील येडागुंडा गावातही घुसखोरी केली, जिथे नक्षलवाद्यांनी जंगलातील अतिक्रमण आणि कस्तुरीरंगन अहवालाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली. हे वृत्त समजताच या भागात नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्यात आले. कबिनाळे गावात सोमवारी सुमारे 5 नक्षलवादी किराणा घेण्यासाठी दाखल झाले होते. गावात प्रवेश करताच त्यांची एएनएफ टीमशी चकमक झाली. या गोळीबारात नक्षलवादी विक्रम गौडा ठार झाला, तर उर्वरित नक्षलवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. (Karnataka News)
(हेही वाचा – Border – Gavaskar Trophy 2024 : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी रवी शास्त्रींनी भारतीय संघाला सुनावले खडे बोल)
कर्नाटकात सक्रिय असलेल्या नक्षलवादी नेत्यांमध्ये विक्रम गौडा (Vikram Gowda) यांचे नाव प्रमुख होते. परिसरातील अनेक हिंसक घटनांमध्ये त्याचा सहभाग होता. एएनएफ (ANF) आणि पोलिसांच्या कारवाईला मिळालेल्या यशानंतर या भागातील नक्षलवादी कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून शोध मोहीम सुरू आहे. या चकमकीनंतर पोलिसांनी या भागातील सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत केली आहे. (Karnataka News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community