Canada तील हिंदू मंदिरावरील हल्ल्याचे खलिस्तानी कनेक्शन; दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या जवळचा अटकेत

82
Canada तील हिंदू मंदिरावरील हल्ल्याचे खलिस्तानी कनेक्शन; दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या जवळचा अटकेत
Canada तील हिंदू मंदिरावरील हल्ल्याचे खलिस्तानी कनेक्शन; दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या जवळचा अटकेत

कॅनडातील (Canada) ब्रॅम्प्टन येथील हिंदू मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी चौथ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ब्रॅम्प्टन येथील इंद्रजीत गोसल (३५) (Indrajit Gosal) असे आरोपीचे नाव आहे. तो मंदिरावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड असून तो खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूचा (Gurpatwant Singh Pannu) जवळचा असल्याचे बोलले जात आहे. (Canada)

गोसल या हल्ल्याचा मास्टरमाईंड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रजीत गोसलने ग्रेटर टोरंटोमधील हिंदू मंदिरांवर हल्ल्याची योजना आखली होती. तो शीख फॉर जस्टिस (SFJ) संघटनेचा प्रमुख पन्नूचा उजवा हात आहे आणि कॅनडात नुकत्याच झालेल्या हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर खलिस्तान समर्थक कारवायांवर लक्ष ठेवत होता. गोसल यांना ८ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती, मात्र न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. त्याला पुढील तारखेला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Canada)

एसआयटीकडून हल्ल्याचा तपास सुरू
पोलिसांनी या प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) तयार केले आहे, जे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासत आहे. 4 नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कॅनडातील हिंदू मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध करत कॅनडाच्या सरकारला कडक संदेश दिला. (Canada)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.