भारताचा मोस्ट वॉन्टेड खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडे (72) याचा पाकिस्तानमध्ये मृत्यू झाला आहे. खलिस्तान लिबरेशन फोर्स (KLF) आणि इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशन (Khalistani Terrorist) या प्रतिबंधित संघटनेचा तो प्रमुख होता. रोडे हा जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचा पुतण्या होता.
रोडेचे 2 डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अकाल तख्तचे माजी जथ्थेदार जसबीर सिंग रोडे यांनी त्याच्या मृत्यूला दुजोरा दिला. एका खासगी वृत्तसंस्थेशी बोलताना जसबीर सिंग रोडे म्हणाले की, त्यांना त्यांच्या भावाच्या मुलाने लखबीरचा पाकिस्तानमध्ये मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. भारत सरकारने यूएपीएअंतर्गत लखबीर सिंग रोडेला दहशतवादी घोषित केले होते. त्यानंतर तो पाकिस्तानात पळून गेला. २०२१ मध्ये पंजाबच्या लुधियाना कोर्टात झालेल्या स्फोटात दहशतवादी लखबीर सिंग रोडेचे नावही समोर आले होते. यासोबतच १९८५ मध्ये एअर इंडियाच्या बॉम्बस्फोटातही दहशतवादी रोडेला आरोपी करण्यात आले होते.
(हेही वाचा – India’s Tour of South Africa : भारताविरुद्धच्या टी-२० व एकदिवसीय मालिकेसाठी टेंबा बवुमाला विश्रांती, मार्करम करणार नेतृत्व )
अमृतसरमध्ये पाठवले ग्रेनेड आणि टिफिन बॉम्ब
मोस्ट वाँटेड खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडे पंजाबमध्ये स्लीपर सेल तयार करत होता. अमृतसरमध्ये सीमेवरून ग्रेनेड आणि टिफिन बॉम्बही पाठवले होते. रोडेला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय मदत करत होती. दहशतवादी रिंदा हाही रोडेच्या संपर्कात होता. पंजाबच्या एजन्सींनी नुकत्याच केलेल्या खुलाशानुसार, रोडेने पंजाबमध्ये सुमारे 70 स्लीपर सेल तयार केले आहेत. एका स्लीपर सेलमध्ये 2-3 लोक होते. एजन्सींनी उघड केले होते की, काही स्लीपर सेल असे आहेत जे अद्याप सक्रिय झाले नाहीत.
(हेही वाचा – India’s Tour of South Africa : भारताविरुद्धच्या टी-२० व एकदिवसीय मालिकेसाठी टेंबा बवुमाला विश्रांती, मार्करम करणार नेतृत्व )
स्फोट घडवण्याची योजना आखत असल्याचा खुलासा
दहशतवादी लखबीर सिंग रोडे भारतातील गजबजलेल्या भागात स्फोट घडवण्याची योजना आखत असल्याचा खुलासा भारतीय यंत्रणांनी आधीच केला होता. पंजाबमध्ये काही स्लीपर सेल होते, ज्यांना भिंतींवर खलिस्तानी घोषणा लिहिण्याचे आणि त्यासंबंधित पोस्टर्स चिकटवण्याचे काम देण्यात आले होते. भिंतींवर घोषणा लिहिणाऱ्या आणि पोस्टर चिकटवणाऱ्या स्लीपर सेलच्या सदस्यांना 5,000 ते 20,000 रुपये देण्यात आले. पैशांची देवाणघेवाण फक्त पंजाबमध्येच होत असे.
स्लीपर सेलचे सदस्य एकमेकांना ओळखतही नाहीत
पंजाब पोलिसांनी खुलासा केला होता की, दहशतवादी रोडे याने स्लीपर सेल टीममध्ये १५०हून अधिक सदस्य बनवले होते. स्लीपर सेलमधील एकही सदस्य एकमेकांना ओळखत नव्हता. तसेच स्लीपर सेल सदस्याचा नंबरही कोणाकडे नाही. जेव्हा जेव्हा शस्त्रास्त्रांची खेप येते तेव्हा फक्त १ किंवा २ स्लीपर सेल सदस्यांना याची माहिती असते, तर इतर सदस्यांना त्याबद्दल माहिती नसते.
एनआयएने संपत्ती जप्त केली होती
काल पंजाबमधील मोगा येथे भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) पथकाने दहशतवादी लखबीर रोडेची सुमारे ४३ कनाल जमीन सील केली होती. तेथे एनआयए आपल्या पोलीस पथकासह दाखल झाले होते. पंजाब सरकारने त्यांना प्रशिक्षणाचे आदेशही दिले होते. पथक आल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने निहंग घटनास्थळी दाखल झाले होते.आता खलिस्तानींचे तीन चेहरे समोर येत आहेत. हे तिघेही शिख फॉर जस्टिस या भारतातील प्रतिबंधित संघटनेशी संबंधित आहेत. त्याचबरोबर SFJ प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यांच्यावरही भारतीय एजन्सी लक्ष ठेवून आहेत.
हेही पहा –