मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह या सीमावर्ती शहरात बुधवारी सकाळी सुरक्षा दल आणि कुकी दहशतवाद्यांमध्ये (Kuki Terrorists) गोळीबार झाला. कुकी दहशतवाद्यांनी एसबीआय (SBI) मोरेजवळील सुरक्षा दलाच्या चौकीवर बॉम्ब फेकले आणि गोळीबार केला. दरम्यान सुरक्षा दलांनी या भ्याड हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त अधिकृत माहितीनुसार, मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह या सीमावर्ती शहरात आज, बुधवारी सकाळी सुरक्षा दल आणि संशयित कुकी दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. कुकी दहशतवाद्यांनी एसबीआय मोरेजवळील सुरक्षा दलाच्या चौकीवर बॉम्ब फेकले आणि गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले.
(हेही वाचा – Ind vs Afg 3rd T20 : रिषभ पंतही भारतीय संघाच्या सरावात सामील झाला तेव्हा…)
या गोळीबारात एका सुरक्षा रक्षकाला किरकोळ दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. एका पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना अटक केली होती. या कारवाईमुळे शांतता भंगाची शक्यता लक्षात घेऊन तेंगनौपाल परिसरात 16 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेपासून संचारबंदी लावण्यात आली होती. या घटनेनंतर 48 तासांनी कुकी दहशतवाद्यांनी सुरक्षादलाच्या चौकीवर हा हल्ला केलाय. याशिवाय पश्चिम इम्फाल जिल्ह्यात मंगळवारी रात्री कुकी दहशतवाद्यांची गावातील स्वयंसेवकांशी तब्बल 2 तास चकमक झाली; परंतु केंद्रीय सुरक्षा दल या ठिकाणी दाखल होताच कुकी दहशतवाद्यांनी गोळीबार थांबवून पळ काढला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community