Kupwara Encounter : काश्मीरमधील कुपवाड्यात भारतीय सेनेला मोठे यश! दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

180

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. हे दहशतवादी लश्कर-ए-तोयबा या जिहादी संघटनेशी संबंधित होते. यापैकी एक तहशतवादी पाकिस्तानी असल्याची माहिती जम्मू-काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी दिली.

( हेही वाचा : PF मधून विनाकारण पैसे काढत असाल, तर होऊ शकते लाखोंचे नुकसान! कसे ते वाचा…)

दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू

सुरक्षा दलांना कुपवाडा येथील चक्रकंडी येथे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर सैन्य आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने नाकाबंदी केल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्यानंतर सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले आणि 2 दहशतवाद्यांना ठार केले. या भागात अजूनही दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे.

दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

काश्मीर झोनचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, लश्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी मारले गेले आहेत. यात पाकिस्तानी दहशतवादी तुफैलचाही हात असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरात लष्कर आणि पोलिसांची शोधमोहीम सुरू असून, यापूर्वी सोमवारी बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लश्कर-ए-तोयबाचा एक पाकिस्तानी दहशतवादी ठार झाला होता. तर तीन दहशतवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याकडून 47 रायफल, 5 मॅगझिन आणि अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत 2020 मध्ये 221 आणि 2021 मध्ये 193 दहशतवादी ठार करण्यात आले होते तर यावर्षी 6 जूनपर्यंत 96 दहशतवादी मारले गेले आहेत, ही माहिती कुमार यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.