चीनच्या कुरापत्या सुरुच! पुलानंतर आता सीमेजवळ उभारले मोबाईल टाॅवर

148

चीन नेहमीच त्याच्या कुरापतींसाठी ओळखला जातो. चीनने लडाखमधील पॅंगॉन्ग सरोवरावर पूल बांधल्यानंतर, आता चुशूल प्रदेशातील सीमेवर मोबाईल टॉवर उभारले आहेत. चुशुल शहराचे नगरसेवक कोन्चोक स्टॅनझिन यांनी एक ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी दावा केला की चीनच्या हॉट स्प्रिंगजवळ तीन मोबाइल टॉवर भारतीय भूभागाच्या अगदी जवळ बसवण्यात आले आहेत.

नगरसेवकांनी व्यक्त केली भीती

चीनने याआधी  पॅंगॉन्ग सरोवरावर पूल बांधला होता. त्यानंतर आता चीनने भारतीय भूभागाच्या अगदी जवळ तीन मोबाइल टॉवर्स उभारले आहेत.  ही चिंतेची बाब नाही का? आमच्याकडे मानवी वस्तीच्या गावांमध्ये 4G सुविधाही नाही. माझ्या मतदारसंघातील 11 गावांमध्ये 4G सुविधाही उपलब्ध नसल्याचे, स्टॅनझिन यांनी म्हटले आहे.  एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधताना नगरसेवक म्हणाले की, टॉवर्सचा वापर आमच्या प्रदेशाचे निरीक्षण करण्यासाठी आणि माहिती पुरवण्यासाठी केला  जाऊ शकतो. चीन सीमेच्या बाजूला “जलद पायाभूत सुविधांचा विकास करत आहे” असा दावाही त्यांनी केला.

( हेही वाचा: राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी जाणाऱ्या भारतीय युवा टेबल टेनिस खेळाडूचा अपघातात मृत्यू! )

भारत चीन संघर्ष सुरु

या वर्षी फेब्रुवारीमध्ये, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी लोकसभेत सांगितले होते की चीन 1962 ला अनधिकृतरित्या भारताकडून घेतलेल्या भागात पॅंगॉन्ग सरोवरावर एक पूल बांधत आहे. 2020 ला पॅंगॉन्ग परिसरात झालेल्या लष्कराच्या चकमकीनंतर भारत आणि चीन यांच्यातील लडाख सीमेवर संघर्ष सुरू झाला. त्याच वर्षी जूनमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर परिस्थिती आणखीनच चिघळली. या भागातील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी चर्चेच्या 15 फेऱ्या केल्या.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.