काही दिवसांपूर्वी एल अँड टी (Larsen And Toubro) कंपनी तिचे चेअरमन एसएन सुब्रह्मण्यन (SN Subrahmanyan) यांनी केलेल्या एका विधानामुळे वादाचा केंद्रबिंदू बनली होती. कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना सुब्रह्मण्यन यांनी घरात बसून बायकोचे तोंड किती वेळ पाहात बसणार, त्यापेक्षा ऑफिसला या. 90 तास काम करा, असा सल्ला दिला होता. मला शक्य झालं असतं तर मी कर्मचाऱ्यांना रविवारीही काम करायला लावलं असतं, असं त्यांनी म्हटले होते. (Larsen And Toubro)
हेही वाचा-Donald Trump यांच्या नागरिकत्वाच्या आदेशाला भारतीय-अमेरिकन सिनेटर्सचा विरोध
दरम्यान, संरक्षण दलाने देशातील (Indian Defence Ministry) दिग्गज कंपन्यांपैकी एक असलेल्या लार्सन अँड टुब्रोला (Larsen And Toubro) चांगलाच झटका दिला आहे. सरकारने सहा पाणबुड्या विकत घेण्यासाठी 70 हजार कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. यासाठी एल अँड टीने देखील बोली लावली होती. मात्र त्यांची बोली फेटाळण्यात आली आहे.
हेही वाचा-Temple Management : पुणे विद्यापीठात आता मंदिर व्यवस्थापनाचे धडे देणार ; ‘असा’ असेल अभ्यासक्रम
कंपनीने अटी-शर्तींचे पालन न केल्याने त्यांची बोली फेटाळण्यात आल्याचे संरक्षण विभागातर्फे सांगण्यात आले आहे. भारतीय नौदलासाठी अत्याधुनिक पाणबुड्या खरेदी करण्यात येणार आहेत. तीन आठवड्यांपर्यंत पाण्यात राहू शकतील, अशा पाणबुड्या खरेदी करण्यासाठी निविदा जारी करण्यात आली होती. (Larsen And Toubro)
हेही वाचा-DK Rao Arrested : कुख्यात गँगस्टर डी.के.राव याला गुन्हे शाखेकडून अटक; खंडणीप्रकरणी केली कारवाई
या निविदेसाठी एल अँड टीने स्पेनची कंपनी नॅवेंटीयाशी हातमिळवणी करत बोली लावली होती. मात्र नौदलाच्या गरजेनुसार त्यांच्या बोलीमध्ये तरतुदी दिसत नसल्याने त्यांची बोली फेटाळण्यात आली. प्रोजेक्ट 75 अंतर्गत या पाणबुड्या खरेदी करण्यात येत आहेत आणि ‘एल अँड टी’ ही पूर्वीपासून पाणबुडी प्रकल्पाचा भाग राहिलेली आहे हे विशेष. एल अँड टी स्पर्धेतून बाहेर झाल्याने आता माझगाव डॉक ही कंपनी स्पर्धेत उरली आहे. माझगाव डॉकने जर्मनीची कंपनी थस्सिनक्रूप सिस्टिमच्या सहकार्याने या निविदेसाठी बोली लावली आहे. (Larsen And Toubro)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community