राज्यात बर्ड फ्लूचा (Bird flu) कहर वाढत आहे. लातूर जिल्ह्यातील एका पोल्ट्री फार्मवरील ४२०० पिल्ल अचानक दगवाली आहेत. त्यामुळे प्रशासन अॅक्टिव्ह मोडवर आलं आहे. दोन ते तीन दिवसातच पिल्ल दगावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रशासनाने या पिल्लांचे सॅम्पल पुणे येथील प्राण्यांशी संबंधित प्रयोगशाळेकडे पाठवले. पिल्लं नेमकी कशामुळे दगावली याची चौकशी आणि तपास करण्यात येत आहे. (Bird flu)
हेही वाचा-Bhandara Blast : स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट ; १३ मृत, आकडा वाढण्याची शक्यता
दरम्यान आणखी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. चंद्रपूर येथील ट्रांजिट ट्रीटमेंट सेंटर मधील 4 पैकी 2 बिबट्यांची (Leopards) H5N1 अर्थात बर्ड फ्लू ची “सिरो” टेस्ट (Siro test) पॉझिटिव्ह आली आहे. भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ऍनिमल डिसीसेसचा (National Institute of High Security Animal Diseases) अहवाल समोर आला असून आता बिबट्यांनाही बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे उघड झाले आहे. (Bird flu)
हेही वाचा-Shreyas Talpade: अभिनेता श्रेयस तळपदेसह ११ जणांविरोधात FIR दाखल ; प्रकरण काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील गोरेवाडा येथे 4 वाघांचा बर्ड फ्लू मुळे मृत्यू झाल्यानंतर चंद्रपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथील प्राण्यांची देखील चाचणी करण्यात आली होती. ती चाचणी आता पॉझिटिव्ह आली आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्या पूर्वी मृत पावलेल्या 4 गिधाडांची देखील बर्ड फ्लू टेस्ट ही पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यातील प्राणिसंग्रहालयांना ‘हाय अलर्ट’ चा इशारा देण्यात आला होता. पण आता तर आता बिबट्यांची बर्ड फ्ल्यू टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Bird flu)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community