लेफ्टनंट जनरल Sadhana Saxena Nair यांच्याकडे महासंचालक पदाची जबाबदारी, १ ऑगस्टला स्वीकारणार पदभार

लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर १ ऑगस्टपासून वैद्यकीय सेवा (लष्कर) महासंचालक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. या प्रतिष्ठेच्या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला असतील.

216
लेफ्टनंट जनरल Sadhana Saxena Nair यांच्याकडे महासंचालक पदाची जबाबदारी, १ ऑगस्टला स्वीकारणार पदभार
लेफ्टनंट जनरल Sadhana Saxena Nair यांच्याकडे महासंचालक पदाची जबाबदारी, १ ऑगस्टला स्वीकारणार पदभार

लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर १ ऑगस्टपासून वैद्यकीय सेवा (लष्कर) महासंचालक (Director General of Army Medical Services) म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. या प्रतिष्ठेच्या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला असतील. यापूर्वी, एअर मार्शल पदावर पदोन्नती झाल्यानंतर हॉस्पिटल सर्व्हिसेस (आर्म्ड फोर्सेस) च्या महासंचालक पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.  (Sadhana Saxena Nair)

(हेही वाचा – Ind vs SL, 3rd T20 : बघूया वॉशिंग्टन सुंदरची प्रभावी सुपर ओव्हर)

साधना सक्सेना नायर यांनी गेल्या वर्षी हॉस्पिटल सर्व्हिसेस (सशस्त्र दल) महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “हवाई दलाच्या अधिकारी असलेल्या एअर मार्शल साधना सक्सेना नायर प्रभावीपणे सेवा करणाऱ्या दुसऱ्या महिला अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हवाई दलातील विविध पदांवर काम केल्यानंतर त्या एअर मार्शल पदापर्यंत पोहोचल्या.” पदभार स्वीकारताना हवाई दल प्रमुख व्ही.आर. चौधरी (Chief of Air Force V.R. Chaudhary) देखील उपस्थित होते.

(हेही वाचा – Pooja Khedkar वर UPSC ची मोठी कारवाई; आयएएस पद केले रद्द, भविष्यात पुन्हा UPSC परीक्षेला बसण्यास केली मनाई)

१९८५ मध्ये आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये नियुक्ती

लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर (Lt. Gen. Sadhana Saxena Nair) यांनी त्यांचं शालेय शिक्षण सेंट मेरी कॉन्व्हेंट (प्रयागराज), लोरेटो कॉन्व्हेंट (लखनऊ) नंतर तेजपूर, गोरखपूर, कानपूर आणि चंदीगड अशा विविध ठिकाणच्या शाळांमध्ये घेतलं. पुढे जाऊन त्यांनी पुण्याच्या सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. आणि डिसेंबर १९८५ मध्ये आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये नियुक्ती झाली. साधना नायर यांनी फॅमिली मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांनी AIIMS, नवी दिल्ली येथे वैद्यकीय माहिती शास्त्राचा दोन वर्षांचा प्रशिक्षण कार्यक्रमही पूर्ण केला आहे. (Sadhana Saxena Nair)

तसेच विशिष्ट सेवा पदकाने गौरवण्यात आले

लेफ्टनंट जनरल साधना यांनी सीबीआरएन (केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लियर) युद्ध आणि लष्करी वैद्यकीय नैतिकतेचे परदेशात प्रशिक्षण घेतले. वेस्टर्न एअर कमांड आणि ट्रेनिंग कमांडच्या त्या पहिल्या आणि एकमेव महिला मुख्य वैद्यकीय अधिकारी होत्या. साधना यांना विशिष्ट सेवा पदकही मिळाले आहे.  (Sadhana Saxena Nair)

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.