लष्कर आणि हवाई दलाच्या ताफ्यात Light Combat Helicopters दाखल होणार

Light Combat Helicopters पैकी 90 लष्कराकडे आणि 66 हवाई दलाकडे सुपुर्द केल्या जातील. सरकारच्या या निर्णयामुळे संरक्षण क्षेत्रात 'मेड इन इंडिया' अधिक बळकट होईल.

135
लष्कर आणि हवाई दलाच्या ताफ्यात Light Combat Helicopters दाखल होणार
लष्कर आणि हवाई दलाच्या ताफ्यात Light Combat Helicopters दाखल होणार

मेक इन इंडियाच्या (Make in India) माध्यमातून संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी भारत सरकार (Government of India) सातत्याने प्रयत्न करत आहे. या संदर्भात सरकारी मालकीच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) 156 हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्स (Light Combat Helicopters) खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून 45 हजार कोटी रुपयांची निविदा प्राप्त झाली आहे.

कंपनीने सांगितले की, संरक्षण मंत्रालयाने 156 एलसीएचच्या खरेदीसाठी प्रस्तावासाठी विनंती (आरएफपी) जारी केली आहे. यापैकी 90 हेलिकॉप्टर्स लष्करासाठी आणि 66 भारतीय हवाई दलासाठी आहेत.

(हेही वाचा – Lok Sabha Speaker पदी महिला नेत्या दिसणार ?; काय आहे भाजपची रणनिती…)

65,000 कोटी रुपयांची निविदा जारी

मिळालेल्या माहितीनुसार, निविदेची किंमत 45 हजार कोटींपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या सुरुवातीला संरक्षण मंत्रालयाने 97 स्वदेशी एलसीए मार्क 1ए लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी एचएएलला 65,000 कोटी रुपयांची निविदा जारी केली होती.

एल.सी.एच.ला (Hindustan Aeronautics Limited) ‘प्रचंड’ म्हणूनही ओळखले जाते, जो आत्मनिर्भर भारताचा एक भव्य पुरावा आहे. 5,000 मीटर (16,400 फूट) उंचीवर उतरणारे आणि उड्डाण करणारे प्रचंड हे जगातील एकमेव हेलिकॉप्टर आहे. सियाचीन हिमनदी आणि पूर्व लडाखच्या उंच भागात हे तैनात केले जाऊ शकते. ते हवेतून जमिनीवर आणि हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे पाडण्यासही सक्षम आहे. (Light Combat Helicopters)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.