सध्याचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे 31 मे 2024 रोजी ते निवृत्त होणार होते. परंतु 26 मे 2024 रोजी मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांना सेवेत एक महिन्याची मुदतवाढ दिली. ते 30 जून 2024 पर्यंत सेवा बजावणार आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी (Lt Gen Upendra Dwivedi) होणार नवीन लष्करप्रमुख म्हणून सेवा बजावणार आहेत. जनरल मनोज पांडे (Manoj Pandey) यांना 30 एप्रिल 2022 रोजी लष्करप्रमुख बनवण्यात आले होते.
(हेही वाचा – Porsche Accident Pune : किडनी तस्करीतही अडकलेला Dr. Ajay Taware)
कशी आहे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची कारकीर्द ?
मध्य प्रदेशातील रेवा येथील सैनिक शाळेचे माजी विद्यार्थी लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांना 1984 मध्ये 18 जम्मू आणि काश्मीर (J&K) रायफल्समध्ये नियुक्त करण्यात आले. त्यानंतर त्यांनी या युनिटची कमान घेतली. नॉर्दर्न आणि वेस्टर्न दोन्ही थिएटरमध्ये समतोल अनुभव असण्याचे अनोखे वेगळेपण जनरल ऑफिसरला आहे. उत्तर आर्मी कमांडर म्हणून आपल्या कार्यकाळात, लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये गतिमान दहशतवादविरोधी कारवाया करण्यासोबतच उत्तर आणि पश्चिम सीमेवर सतत ऑपरेशन्सचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी धोरणात्मक मार्गदर्शन आणि ऑपरेशनल पर्यवेक्षण प्रदान केले.
विवादित सीमाप्रश्न सोडवण्यासाठी चीनसोबत सुरू असलेल्या चर्चेत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला होता. लेफ्टनंट जनरल द्विवेदी (Upendra Dwivedi) यांना अमेरिकेत पाठवण्यात आले. आर्मी वॉर कॉलेज, कार्लिस्ले, यूएसए 2017 मध्ये नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या समकक्ष अभ्यासक्रमात ‘डिस्टिंग्विश्ड फेलो’ (Distinguished Fellow) म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यांनी संरक्षण आणि व्यवस्थापन विषयात एम.फिल. याशिवाय स्ट्रॅटेजिक स्टडीज आणि मिलिटरी सायन्स या दोन पदव्युत्तर पदव्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community