लेफ्ट. जनरल खंदारे संरक्षण मंत्रालयाचे सल्लागार 

184
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद जी. खंदारे यांची संरक्षण मंत्रालयात सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते संरक्षण सचिवांसोबत जवळून काम करतील, असे संरक्षण सूत्रांनी सांगितले. लेफ्टनंट जनरल खंदारे हे आंतरराष्ट्रीय संरक्षण महामंडळ, सागरी सुरक्षा व्यवस्था, संरक्षण धोरण तयार करणे यांसह धोरणात्मक भूमिका घेणे आणि सल्ला देणे यामध्ये सहभागी असणार आहेत.

कोण आहेत लेफ्टनंट जनरल खंदारे? 

लेफ्टनंट जनरल खंदारे हे जानेवारी २०१८ च्या अखेरीस लष्करातून निवृत्त झाले. तेव्हापासून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत त्यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय (NSCS) मध्ये लष्करी सल्लागार म्हणून काम केले. नोव्हेंबर 2015 ते जानेवारी 2018 पर्यंत त्यांनी संरक्षण गुप्तचर विभागाचे महासंचालक आणि इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ फॉर इंटेलिजेंसचे उपप्रमुख म्हणून काम केले. सप्टेंबर 1979 मध्ये त्यांना 14 गढवाल रायफल्समध्ये नियुक्त करण्यात आले आणि त्यांनी सुमारे चार दशके सियाचीन, जम्मू आणि काश्मीर, सिक्कीम आणि ईशान्य प्रदेशात विविध भूभाग आणि तेथील लष्करी कारवायांमध्ये महत्वाची भूमिका बजावली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.