आयएनएस रणवीरमध्ये स्फोट! ३ जवान हुतात्मा

90

मुंबईतील नौदलाचा तळ असलेल्या नेव्हल डॉकयार्डमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथे असलेल्या आयएनएस रणवीरमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात नौदलाचे तीन जवान हुतात्मा झाले आहेत.

नेव्हल डॉकयार्डमध्ये घटना

दरम्यान जहाजावरील कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. मात्र जहाजाला फार मोठं नुकसान झालेलं नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज नेव्हल डॉकयार्डमध्ये आयएनएस रणवीरच्या अंतर्गत भागात भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर जहाजावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने पावले उचलत परिस्थिती नियंत्रणात आणली. या स्फोटात जहाजाचे फारसे नुकसान झालेलेले नाही. तसेच हा स्फोट कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

(हेही वाचा भारतीय सैन्य दिवस : ट्विटरवरही सैन्याच्या तिन्ही दलास दिली मानवंदना)

हा स्फोट झाल्यावर, जहाजावरील कर्मचाऱ्यांनी त्वरित आणि तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या. या घटनेत मोठी वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. आयएनएस रणवीर ही युद्धनौका, नोव्हेंबर 2021 पासून, पूर्व नौदल कमांडमधून क्रॉस कोस्ट कार्यवाहीसाठी इथे तैनात होती आणि लवकरच ही नौका आपल्या तळावर परत जाणार होती. या घटनेच्या बोर्ड ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.