मलावीचे उपराष्ट्रपती साउलोस चिलिमा (५१) यांच्यासह 9 जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. सोमवारी त्यांना घेऊन जाणारे लष्करी विमान बेपत्ता झाले होते. या विमानाशी संपर्क साधण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. (Saulos Chilima)
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, उपराष्ट्रपती साउलोस चिलिमा हे मलावा संरक्षण दलाच्या विमानात होते. विमानाने सोमवारी, (१० जून) सकाळी मलावीची राजधानी लिलोंगवे येथून उड्डाण केले होते. विमानात उपराष्ट्रपती साउलोस चिलिमा यांच्यासह एकूण १० लोकं होते. हे विमान सोमवारी सकाळी झुझू येथे उतरण्याचे ठरले होते, परंतु ते उतरण्यापूर्वीच त्यांचा संपर्क तुटला. (Saulos Chilima)
(हेही वाचा – Ratnagiri जिल्ह्यात दरड कोसळली, अनेक गावांचा संपर्क तुटला; नेमकं काय घडलं? जाणून घ्या)
विमानाशी संपर्क साधण्यात अपयशी ठरल्यानंतर राष्ट्रपतींनी शोध आणि बचाव कार्याचे आदेश दिले होते. अनेक शोध आणि बचाव पथके बेपत्ता विमानाशी संपर्क साधण्याचा आणि त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत होते. विमान अपघातात उपराष्ट्रपतींचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात होती या घटनेनंतर मलावीचे अध्यक्ष लाझारस चकवेरा यांनी त्यांचा बहामास दौरा रद्द केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community