Indian Navy: माल्टा देशाचे जहाज समुद्री चाच्यांकडून हायजॅक; भारतीय नौदलाकडून युद्धनौका, विमान मदतीसाठी रवाना

माल्टाचे हे जहाज कोरियाहून तुर्कियेला जात होते.

254
Indian Navy: माल्टा देशाचे जहाज समुद्री चाच्यांकडून हायजॅक; भारतीय नौदलाकडून युद्धनौका, विमान मदतीसाठी रवाना
Indian Navy: माल्टा देशाचे जहाज समुद्री चाच्यांकडून हायजॅक; भारतीय नौदलाकडून युद्धनौका, विमान मदतीसाठी रवाना

भारतीय नौदलाकडून (Indian Navy) अरबी समुद्रात (Arabian Sea) बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. अरबी समु्द्रात माल्टा देशाचे (Malta) जहाज MV रुएनचे अपहरण करण्यात आले आहे. या घटनेची माहिती समोर येताच भारतीय नौदलाने तातडीने बचाव कार्यासाठी धाव घेतली आहे. भारतीय नौदलाने आपली एक युद्धनौका  आणि समुद्रात गस्त घालणाऱ्या विमानाला रवाना केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माल्टाचे हे जहाज कोरियाहून तुर्कियेला जात होते. यावेळी सोमालियातील समुद्री चाच्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. भारतीय नौदलाची विमाने या जहाजाच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. आता हे जहाज सोमालियाच्या किनाऱ्याकडे सरकत असल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Intrusion : सूत्रधाराची पोलिसांना माहिती; संसदेत पोहचू शकलो नसतो तर…)

वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तासार, या प्रकरणी भारतीय नौदलाची प्रतिक्रियाही समोर आली आहे. अरबी समुद्रात घडलेल्या एका घटनेवर आम्ही तातडीने प्रत्युत्तर दिल्याचे नौदलाच्या वतीने सांगण्यात आले आहे. हे माल्टाहून आलेले जहाज होते. या जहाजात 18 जण उपस्थित होते. समुद्री चाच्यांनी या जहाजाचे अपहरण केले होते. एडनच्या खाडीत गस्तीवर असलेल्या पथकाला माल्टा देशाचे जहाज MV रुएनकडून अपहरण  झाल्याचा संदेश मिळाला होता. ही माहिती मिळाल्यानंतर बचाव कार्यासाठी तात्काळ मदत पाठवण्यात आली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.